श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ॲपचे लोकार्पण
अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘ *सनातन पंचांग २०२७’* या हिंदी ॲपचे पुणे येथे शेकडो लोकांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. ‘धर्मश्री’, पुणे येथे झालेल्या या लोकार्पण सोहळ्यात प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांनी ‘सनातन पंचांग’ ॲपचे कौतुक करून शुभाशीर्वाद दिले.
या लोकार्पणाबद्दल ‘सनातन पंचांग’ समूहाच्या वतीने प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या चरणी भावपूर्ण कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या वेळी सनातन पंचांग समूहाच्या वतीने श्री. पराग गोखले आणि कु. क्रांती पेटकर यांच्या हस्ते प.पू. महाराजांना शाल, श्रीफळ अन् भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.या वेळी सूत्रसंचालक श्री. गोपाळ उपाध्ये यांनी ‘सनातन पंचांग’विषयी उपस्थितांना माहिती दिली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून धर्मप्रसार करणारे ‘सनातन पंचांग’ ॲप अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्रणालींवर मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड, तेलुगु आणि तमिळ अशा सात भाषांमध्ये विनामूल्य उपलब्ध आहे. अँड्रॉइडवर ४१ लाखांहून अधिक, तर आयओएसवर ७ लाखांहून अधिक भाविकांनी हे ॲप डाउनलोड केले आहे.

अमरावतीतील भाविकांनीही या बहुपयोगी ॲपचा लाभ घ्यावा,असे आवाहन करताना हिंदू जनजागृती समितीचे अमरावती जिल्हा समन्वयक श्री. सचिन वैद्य म्हणाले, “‘सनातन पंचांग २०२७’ हे केवळ दिनदर्शिका किंवा पंचांग नसून दैनंदिन धार्मिक आचरणासाठी अत्यंत उपयुक्त असे आधुनिक माध्यम आहे. शुभमुहूर्त, सण-उत्सव, महत्त्वाच्या तिथी, धर्मशिक्षण तसेच विविध उपयुक्त माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होत असल्याने भाविकांना त्याचा मोठा लाभ होऊ शकतो. संकष्टी चतुर्थी, एकादशी यांसारख्या तिथींच्या पूर्वसूचना, रिमाइंडर आणि होमस्क्रीन विजेट यांसारख्या सुविधांमुळे धार्मिक आचरण अधिक सहज आणि नियमित करता येते. विशेषतः हिंदी भाषिक भाविकांसाठी ‘ *सनातन पंचांग २०२७* ’चे हिंदी ॲप उपयुक्त ठरेल. अमरावतीतील अधिकाधिक भाविकांनी हे विनामूल्य ॲप डाउनलोड करून त्याचा लाभ घ्यावा आणि आपल्या नातेवाईक,मित्रपरिवार व परिचितांनाही त्याची माहिती द्यावी.”दैनंदिन जीवनात आवश्यक असणारी विविध माहिती ‘सनातन पंचांग ॲप’मध्ये अत्यंत सुटसुटीतपणे देण्यात आली आहे. यामध्ये शुभमुहूर्त, सण-उत्सव, धर्मशिक्षण, आरोग्यविषयक उपयुक्त टिप्स आणि प्रेरणादायी सुविचार यांचा समावेश आहे. याशिवाय संकष्टी चतुर्थी, एकादशी यांसारख्या महत्त्वाच्या तिथींच्या पूर्वसूचना (नोटिफिकेशन्स), दिनविशेष, होमस्क्रीन विजेट आणि रिमाइंडर यांसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.भारतीय संस्कृती, सण-उत्सव आणि धार्मिक आचरण यांची माहिती आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे ॲप उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे अमरावतीतील भाविकांनी स्वतः हे ॲप डाउनलोड करण्यासोबतच आपल्या कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार, शेजारी आणि सहकाऱ्यांना देखील त्याची माहिती द्यावी, असे आवाहन ‘सनातन पंचांग’ समूहाकडून करण्यात आले आहे.‘सनातन पंचांग’ ॲप डाऊनलोड करण्यासाठी
Sanatanpanchang.com/download-apps या संकेतस्थळाचा उपयोग करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
