नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
संविधानाच्या आर्टिकल 326 नुसार असलेल्या मतदानाच्या घटनात्मक अधिकाराचे संरक्षण करण्यासाठी व मतदार याद्यांमधून मनमानी पद्धतीने नावे वगळल्याच्या निषेधार्थ आज नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयासमोर अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व इंडिया आघाडीच्या वतीने जोरदार जनआंदोलन करण्यात आले.
यावेळी तहसीलदार, नांदगाव खंडेश्वर यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, देशात SIR च्या नावाखाली मतदार याद्यांमधून मनमानी पद्धतीने नावे वगळून मतदारांचा वैधानिक हक्क हिरावून घेतला जात आहे. याची संपूर्ण चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी.तसेच मुख्य निवडणूक आयुक्त श्री. ज्ञानेश कुमार यांना पदावरून दूर करून त्यांच्याविरुद्ध न्यायालयीन कारवाई करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.याबाबत जनतेमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असून विरोधी पक्षनेते मा. राहुलजी गांधी व इंडिया आघाडीचे सर्व प्रमुख नेते एकजुटीने रस्त्यावर उतरून जनआंदोलन करीत आहेत. त्यांच्या समर्थनार्थ नांदगाव खंडेश्वर तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने संविधानाच्या आर्टिकल 326 चे जाहीर वाचन करून “मत वाचवा – देश वाचवा” चा नारा देण्यात आला.जोपर्यंत जबाबदारी निश्चित केली जात नाही व मुख्य निवडणूक आयुक्तांवर कारवाई होत नाही तोपर्यंत हा संघर्ष लढा सुरूच राहणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.या आंदोलनात इंडिया आघाडी व काँग्रेस पक्षाचे नेते माजी विरेंद्र जगताप तुकारामजी भसमे प्रकाश मारोटकर श्याम शिंदे सुनील मेटकर समीर पाटील सरफराज खान अमोल धवसे गजानन भडके सुनील शिरभाते रमेश ठाकरे निशांत जाधव सुशील थोरात गौतम सोनोने दिपक भगत जोतिपाल चवरे मंगेश जोगे प्रकाश इंझळकर तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
