परिवहन मंत्र्यांकडून तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश!
युवा सेनेच शुभम परळीकर व राहुल हजारे यांचींi मागणी
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
टोंगलाबाद येथे प्रवाशांच्या सोयीसाठी प्रशस्त व सुसज्ज बस निवारा उभारण्यात यावा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री मा. प्रतापराव सरनाईक यांची मुंबई येथील मंत्रालयात भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी युवा सेना उपजिल्हाप्रमुख शुभम परळीकर व राहुल हजारे उपस्थित होते. टोंगलाबाद परिसरातील प्रवाशांना बसची प्रतीक्षा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातील प्रवाशांना उन्हाळा, पाऊस तसेच प्रतिकूल हवामानात गैरसोयींचा सामना करावा लागतो. त्यामुळे गावात प्रशस्त बस निवारा उभारणे आवश्यक असल्याचे निवेदनातून निदर्शनास आणून देण्यात आले.

या मागणीची दखल घेत परिवहन मंत्री मा. प्रतापराव सरनाईक साहेब यांनी संबंधित एमडी साहेबांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे टोंगलाबाद येथील बस निवाऱ्याचा प्रश्न मार्गी लागण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करणे आवश्यक असते. याच भूमिकेतून शुभमजी परळीकर व राहुल संगितराव हजारे यांनी टोंगलाबादच्या प्रवाशांच्या सुविधेसाठी पुढाकार घेतला आहे.प्रवाशांची सुरक्षितता, विद्यार्थ्यांची सोय आणि ग्रामीण भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या या प्रयत्नाला मंत्रिमहोदयांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
