राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी
अमरावती/ जिल्हा प्रतिनिधी
पत्रकार समाधान कांबळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ तसेच निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश रामराव कचकलवार यांना तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघटना, महिला आघाडी अमरावती जिल्हा यांच्या वतीने पोलीस आयुक्त कार्यालयात निवेदन देण्यात आले.
हे निवेदन डीसीपी प्रांजली सोनवणे यांच्याकडे सादर करण्यात आले. पत्रकारांवरील हल्ले, धमक्या व दडपशाहीच्या घटनांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.तसेच संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांच्या सुरक्षिततेचा विचार करून त्यांना तात्काळ पोलीस संरक्षण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.यावेळी निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या महिला आघाडीच्या मनीषाताई टाकसाळ, ज्योतीताई भोरे, शुभांगी टाले, अंजलीताई पुंड यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.“पत्रकारांवरील हल्ले थांबले पाहिजेत; पत्रकारांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने ठोस पावले उचलली पाहिजेत,” अशी भूमिका महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी मांडली.
