राधा कृष्णाच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांचे नृत्य
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
स्थानिक एकलव्य गुरुकुल स्कूल नांदगाव खंडेश्वर येथे गोविंदा रे गोपाळाच्या जयघोषाने आणि राधा कृष्णाच्या भक्तीमय वातावरणात नांदगाव खंडेश्वर येथील एकलव्य गुरुकुल स्कूल परिसर दुमदुमून गेला श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमा सोबतच भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन ही उत्साहात साजरा करण्यात आला.
अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सदानंद जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांनी सादर केलेली कृष्णलीला आकर्षक वेशभूषा नृत्यविष्कार आणि दहीहंडीचा थरार यामुळे संपूर्ण वातावरण भक्तीमय व उत्साह पूर्ण झाला होता शाळेच्या वतीने श्रावण महिन्यातील कृष्ण अष्टमी निमित्त जन्माष्टमी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते शाळेच्या प्रवेशद्वारावर काढण्यात आलेली रांगोळी आकर्षक ठरली तसेच सजविण्यात आलेली दहीहंडी विशेष आकर्षण ठरले. अनेक विद्यार्थी राधा कृष्णाच्या रंगीबेरंगी वेशभूषा सहभागी झाले होते या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन एकलव्याचे मुख्य मार्गदर्शक सदानंद जाधव ( राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त ) विशाल ढवळे एकलव्य अकादमी अध्यक्ष. शाळेचे व्यवस्थापक अनुप काकडे. मुख्याध्यापक विलास मारोटकर, पालक प्रतिनिधी जयश्री सुहागपुरे, तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षिका,प्रा. गजानन काकडे, हर्षल रिठे, प्रमोद सुरजुसे, ईश्वर जाधव, प्रकाश लोहांडे, जनार्दन शेलारे, सीमा पोहनकर, सुनिता मारोडकर, आरती काळे, पूजा ठाकरे, सुरेखा लोंदे, रेवती परसनकर, आदिती बोरकर, पूनम तिखीले, अक्षय काळमेघ, राधिका दुधे, नीलिमा देवघरे, अपर्णा चव्हाण, रेखा पंचगडे, वैशाली मोरे, सविता सुने, गुंजा खंडरे, पल्लवी गाडेकर, गुंफा उके, सिद्धीका सोनलकर , अश्विनी शिरभाते, किरण गुल्हाने, प्रिया मेश्राम, लतिका जुनघरे, सोपान ढगे, दिगंबर घोडे, अर्चना लवंगकर, गायत्री चौधरी, यांनी परिश्रम घेतले.
