११ सप्टेंबर आणि १३ सप्टेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन;
समस्त गावकरी आणि भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे नियोजन
चांदूर रेल्वे/तालुका प्रतिनिधी
अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यातील श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) येथील श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान येथे शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता अमावस्येनिमित्त रमणासह चंदनउटी उत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.
या धार्मिक कार्यक्रमासाठी बाहेरगावाहून येणाऱ्या भाविक भक्तांसाठी संस्थानच्या अन्नदान समितीच्या नियंत्रणाखाली महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येणार आहे.श्रावण मास मांडीचा वाढवा रविवार दि. १३ सप्टेंबर सकाळी ९ वाजता मुख्य मंदिरात महाराजांच्या अरजानी करून मुख्य मंदिरातून रमणासह लहान मंदिरातील ढाल व मांड वाढवा होणार आहे.दुपारी १२ वाजता सर्व गावकरी मंडळी आणि भाविक भक्तांकरीता भव्य महाप्रसाद वितरण करण्यात येणार आहे.
भाविकांसाठी दररोज महाप्रसादाची सुविधा-
बाहेरगावाहून येणाऱ्या भाविक भक्तांसाठी संस्थानच्या अन्नदान समितीच्या वतीने दररोज दुपारी १२ ते १.३० आणि रात्री ८ ते ९.३० या वेळेत प्रसाद (भोजन) वितरण करण्यात येत आहे.भाविकांनी संस्थानच्या प्रसादालयात प्रसाद देणगीची पावती घेऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच इच्छुक अन्नदानदाते संस्थानला अन्नदानाची देणगी देऊन या सेवेत सहभागी होऊ शकतात. यासाठी संस्थानशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या सर्व धार्मिक व सामाजिक उपक्रमांना सर्व भाविक भक्तांनी तन-मन-धनाने सहकार्य करून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे, उपाध्यक्ष कृपासागर राऊत, सचिव अशोक सोनवाल तसेच विश्वस्त वसंत शेंडे, गोविंद राठोड, फुलसिंग राठोड, चरणदास कांडलकर, प्रविण कुकडकर, लक्ष्मण राठोड, वैभव मानकर, स्वप्नील चौधरी व समस्त विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
