अमरावती जिल्ह्यातील धारणी प्रकल्पतील पारधी बेड्यांवर भव्य जनजागृती अभियान राबविला जाणार.
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
मागील काही महिन्यांपासून युवा एकीकरण सामाजिक समाज संघटना (अध्यक्ष) उमेश नंतुल पवार व आदिवासी फासेपारधी बहुउद्देशीय ग्रामीण लोककल्याण संस्था(अध्यक्ष ) रवेश भोसले मंगरूळ चव्हाळा आणि श्रीवंश उत्पादक स्वयम सहाय्यता समूह महिला बचत गट (अध्यक्ष)नजेशा भोसले, व इतर संघटना संस्था व बचत गट पदाधिकारी संदेश पवार,शांतेश भोसले, गजानन भोसले, चिंटू भोसले, अनेश पवार,रुपाली पवार, जिल्ह्यातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी, प्रकल्प अधिकारी, उपविभागीय अधिकारी,

स्थानिक तहसीलदार यांच्याशी विविध स्तरावर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पारधी समाजाच्या उत्कर्षांसाठी जिल्हाधिकारी सह जिल्हाप्रशासनाकडे *पारधी विकास व कृती आराखडा* सादर करण्यात आलेला होता. यामध्ये प्रत्येक पारधी बेड्यांवर मूलभूत भौतिक सोईसुविधा, अतिक्रमण वनहक्क दावे, गायरान व ई क्लास अतिक्रमणे नियमित करणे, प्रत्येक पारधी बेड्यांवर राजस्व अभियान राबविणे बाबत बैठकीचे आयोजन करून अमरावती जिल्ह्यासाठी *पारधी विकास कृती आराखडा* सादर केला होता.यावर जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक पावले उचलून युवा एकीकरण सामाजिक समाज संघटना सततच्या पाठपुराव्याची दखल घेतली आहे.या अनुषंगाने धारणी प्रकल्प कार्यालय अंतर्गत असलेल्या आदिवासी वस्त्यांसह पारधी बेड्यांवर धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियांनांतर्गत जनजागृती शिबिराचे आयोजन एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय धारणी मार्फत केले जाणार आहे.या मध्ये अतिक्रमण रहिवासी वनहक्क दावे , जातीचे प्रमाणपत्र , राशन कार्ड, आधार कार्ड, श्रम कार्ड यांसह विविध शासकीय दाखले आदिवासी पारधी समाज बांधवांना मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे.जिल्हाप्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत युवा एकीकरण सामाजिक समाज संघटनेचे (अध्यक्ष) उमेश पवार यांनी व्यक्त केले आहे.
