
उद्यापासून सुरु होणार घाटलाडकी येथील आरोग्य केंद्राची ओपीडी सेवा.
घाटलाडकी /मनोज बारस्कर
घाटलाडकी येथील दोन वर्षांपासून बंद असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण व्हावे या मागणी करीता युवा सेना तालुका प्रमुख रोशन जयसिंगपूरे यांनी लोकार्पण आंदोलनाचा इशारा प्रशासनाला देण्यात आला होता.यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीला हार व फुग्यानी सजवण्यात आले व रिबीन कापून रीतसर युवा सेना स्टईल ने लोकार्पण करण्यात आले, रुग्णच्या सेवेसाठी उद्या दि. 22 /7/2025 पासून तपासणी सुरु करणार असल्याचे लेखी पत्र तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी दिल्या नंतर आंदोलन मागे घेण्यात आले, दिनांक 22 पासून ओ. पी. डी. सूरू होणार असल्यामुळे गरजू लोकांना याचा उपयोग होईल असे समाधान गावकऱ्यांनी यावेळी वेक्त केले यावेळी युवा सेना पश्चिम विदर्भ सचिव सागरजी देशमुख, शिवसेना उपजिल्हा प्रमुख आशिष वाटाने, महिला उपजिल्हा प्रमुख निर्मलाताई कौढन्यपुरे,युवासेनेचे चेतन जवंजाळ, शिवाजी चऱ्हाटे,रोहीत ठाकरे, राहुल गावंडे, सागर वाटाने, दादाराव तायडे, विक्रम फुकट, अजय बरडे,रोशन राठोड, शरद राठोड, यश खाजोने,विभा मांडवगडे,अमितसिह पवार शिवफॉउंडेशन अध्यक्ष, विकास माथने, पांडुरंग बदुकले,आशिब शाह, विठ्ठलराव कुऱ्हाडे,सरपंच शिवानंद मदने, उपसरपंच अब्दुल हाफिज शेख रसूल, अनिलसिह पवार, जुबेर भाऊ, प्रकाश माहोरे, अब्दुल खलिक भाऊ, आनंद श्रीराव, सुयोग वाटकर, गोविंदा लेवटकर, आकाश माहोरे, पिंटू माहोरे, सतीश वऱ्हाडे,शब्बीर खा, नीलदीप जयसिंगपूरे, अनिकेत बिजवे, गोकुल सव्वालाखे, बाबारावजी झटाले,गोलू माहोरे यासाह गावातील नागरिक मोठया संख्येने यावेळी उपस्थित होते या आंदोलनाला पोलीस प्रशासन व डॉक्टर व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.