अंबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे आयोजन
अमरावती/ प्रतिनिधी
अंबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे वतीने ग्रामपंचायत केकतपुर,येथे महिला मेळावा हळदी कुंकू कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते,या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा स्नेहा राऊत मॅडम,माजी जि.प.शिक्षिका,मा गजानन निंभोरकर सर मावीम,मा उमेश महाराज, साखरकर दादा, अध्यक्ष स्थानी केकतपुर गावचे सरपंच मा चरणजी भुजाडे यांची उपस्थिती लाभली, सर्व मान्यवरांनी अमुल्य मार्गदर्शन यावेळी केले,कार्ययक्रमाची सुरूवात दिपप्रज्वलन तसेच स्वागत गीताने झाली, यावेळी उपस्थित अतिथींना छ्त्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली,

विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन,तसेच केकतपुर गावात आपला स्वयंरोजगार करीत असलेल्या बचतगटातील महिलांचे सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले,तसेच दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पण यावेळी करण्यात आला, उपस्थित सर्व ग्रामस्थ भगिनींना पण यावेळी भेटवस्तू देण्यात आल्या,या महिला मेळाव्याला सौ माधुरी सचिन चव्हाण, संस्थापक अध्यक्षा अंबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अमरावती यांनी महिलांनी आत्मनिर्भर व्हावे,तसेच जास्तीत एकत्रित होउन आपला स्वयंरोजगार करावा,याकरीता मार्गदर्शन केले,या कार्यक्रमाचे नियोजन मा कल्पणा ताई देवेंद्र सिह कांगरे यांनी केले,तर सुत्रसंचालन कु प्रियल ठवरे हीने केले,हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सौ सुरेखा लांडे, संगिता चौधरी,प्रीती बारोटकार,शोभा तिडके,कमला बाभुळकर,नीधी खरबडे,अनु लांडे,जिया पठान,मनिषा वाघ,जया वाघ, यांचें विशेष सहकार्य लाभले,या कार्यक्रमाचे आयोजन अंबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अमरावतीच्या वतीने करण्यात आले.
