
२९ वर्षांनी कॉलेजच्या जुन्या आठवणींना उजाळा
अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
महाविद्यालयीन जीवनात विदर्भ महाविद्यालयात १९९३ ते १९९६ पर्यंत शिक्षण घेणारे सर्व जुने विद्यार्थी, मित्र तब्बल २९ वर्षानंतर एकत्र आले. यावेळी जणू पुन्हा कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आल्याचा भास सर्वांना झाला. कॉलेजमधील सवंगडी, वर्ग, लाकडी बाक यांची आठवण प्रत्येकाच्या मनात आयुष्यभर घर करून असते. कॉलेज सोडल्यावर प्रत्येकाचा वाटा वेगवेगळ्या…गेल्या कित्येक वर्षापासून अनेकांची भेट नाही. हणूनच अशा स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात यावे,अशी चर्चा व्हॉटस्ॲप ग्रुपवर सुरु झाली. त्यानंतर जयेश गुप्ता, पंकज मेश्राम,सुधीर रोहणकर,जहरोश गाजी यांच्यासह अनेकांच्या पुढाकाराने शनिवार १४ जून रोजी दस्तुर नगर परीसरातील माऊली पॉईंट हॉलमध्ये या मैत्रिमय कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले.
२९ वर्षापूर्वी एकाच वर्गात खेळीमेळीच्या वातावरणात शिक्षण घेणारे विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यानंतर वेगवेगळ्या शाळा, कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन आज विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. आपली नोकरी, व्यवसाय आणि वैवाहिक जीवनात रमलेल्या १९९६ च्या बॅचचे ते विद्यार्थी तब्बल २९ वर्षांनंतर एकत्र आले होते.
यावेळी २९ वर्षांपूर्वी एकत्र शिकत असलेल्या माजी विद्याथ्र्यांची पुन्हा एकदा शाळा भरली. पन्नासीच्या घरात पोहोचलेले अन् त्याकाळी बाकांवरच्या मित्र-मैत्रिणी सोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा देत सर्वांनी आपला परीचय करून दिला. त्यानंतर पंकज मेश्राम यांनी गायलेल्या दर्दे दिल….दर्दे जिगर…या गितीने कार्यक्र मात आणखी रंगत चढली. दुपारी भोजन आणि त्यानंतर पुन्हा गीत गायन, नृत्याविष्काराने वातावरण आनंदमयी झाले होते. त्यानंतर फोटोसेशन संपल्यानंतर सायंकाळी ४.३० वा. सर्व मित्र-मैत्रिणींनी जड अंतकरणाने एकमेकांना निरोप देत पुन्हा भेटण्याचे वचन दिले….
या स्नेहमिलन सोहळ्यात स्वाती भटकर, ऍड,जयेश गुप्ता,बंडू आठवले ,जहरोश गाजी,सुधीर रोहणकर, प्रमोद नागपुरे, सुनिता साबळे , बब्बू चौधरी , रमजान लालू वाले , पंकज मेश्राम, वैशाली खोब्रागडे, भारती गडपाले, सय्यद तनवीर, उज्वला खंडारे , सुनीता राऊत, संजय आवारे,
राजेश तायडे ,अलका घोम,विवेक काळकर,लीलाधर सिंगरोल,पंकज शिरभाते,
मोहम्मद इद्रीस, ॲड. अतुल आमले, शुभांगी गिरासे राजपूत,
गिरीश देशमुख,सुभाष चोखट, शशांक एस काथे,इंद्रजीत नितनवार,श्रीकांत देशमुख,गीता चिंचाखेड़े मेश्राम,प्रमोद नागापुरे,रामराव वानखेड़े,प्रवीण माहोरे ,अरुणा काळबांडे,
दिनेश थोरात,प्रवीण पवार,अविनाश देशमुख,संदीप गावंडे,शरद मानकर, वैशाली वैद्य,कविता श्रीराव,लता डोंगरे,शालिनी खंडारे,ज्ञानदेव पाटिल, , मनीषा संजय मानकर, वैशाली होले, रेखा ढोके वानखेडे, मनीषा ढोले पाटणे,संतोष, माया सहारे, संगीता दिनेश पांडे,शीतल पाथरे कडू ,
राजेश्वर कवाने ,मीना घुर्दे राऊत, विशाल राठोड , गणेश सरोदे , वैशाली पांडे देशमुख, सुधीर रोहणकर,चंद्रशेखर गजभिये, रजनी शंभरकर गणवीर, मनीषा जायेले, कुलदीप मोहाडीकर,निषीद गायकवाड़,सुषमा पत्की,अविनाश जाधव,
श्याम मुराई , मुकुंद बोडके , जयंत पराते, सुकेश कोरडे ,वीरेंद्र भीसे,
अरुणा हरले, सुधीर माळवे, माधुरी ठाकरे , श्रीरंग ढोके, पंकज नंदेश्वर,
नंदू गुल्हाने , संदीप अंभुलकर, सतीश कनोजिया आदीसह अनेक मित्र मंडळी उपस्थित होती.