
पूर्व सांसद मंत्री मध्यप्रदेश कम्प्युटर बाबा यांच्या हस्ते योजनेचे उद्घाटन
चांदूर बाजार /-सुयोग गोरले
चांदुर बाजार येथे ग्रामीण भागातील विधवा गरजू मातेला सहा योजनेकरिता चांदूरबाजार येथे महिला शक्ती द्वारा ऑफिसचे उद्घाटन करण्यात आले. ही योजना पूर्णा भारत भर गेल्या सात वर्षांपासून सुरू करण्यात आली आहे आज त्या माध्यमातून चांदुर बाजार येथे प्रथम सुरू करण्यात आली आहे असे श्री योगी अवघड पीर जगदंबनाथ गुरु तपस्वी योगी अवघड रामनाथजी यांनी सांगितले आहे या मध्ये महिलांना विधवा महिलांच्या मुलांच्या मोफत शिक्षणाची जिम्मेदारी, आजीवन पेन्शन सुरू करणे व त्या व्यतिरिक्त अनेक योजना चा लाभ महिला शक्ती माध्यमातून सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले यांचे उद्घाटन पूर्व सांसद मंत्री कम्प्युटर बाबा यांच्या हस्ते चांदूरबाजार येथील गोकुलधाम कॉलनी येथे करण्यात आले ही योजना श्री गुलाब जैस्वालजी राष्ट्रीय अध्यक्ष , सौ अनिता सिह राष्ट्रीय महिला अध्यक्ष, बजरंग दास गुरू यांच्या मार्गदर्शनाखाली संजय पाटील उर्फ जगदंब महाराज यांना सुरू करण्याकरिता देण्यात आले आहेत 15 निराधार विधवा मातेंना मदतीचा आधार देण्यात आला असून यांची सुरुवात चांदुर बाजार येथे करण्यात आली आहे या वेळी उपस्थित स्नेहाताई बाजपेयी ,मीराताई खडसे, राणीताई व्यास ,आरतीताई शर्मा, किरणताई शेंडे, स्नेहाताई शुक्ला आधी मोठ्या संख्येने महिला वर्ग व सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.