
गावठाण विस्तार करण्याची मागणी मुख्याधिकाऱ्यांना दिलेली निवेदन.
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वात १० ऑगस्ट २०१५ पासुन गावठाण तथा शासकीय जागेत इमला उभारुन राहणाऱ्या भोगवटा धारकांचा भुखंड कायम करून गाव नमुना ८’अ’ द्या. या मागणीच्या लढ्याला सुरवात झाली. अनेक आंदोलने मोर्चे काढुन, भूमि अभिलेख कार्यालयाकडून भोगवटा धारकांची मोजणी करण्यात आली. विभागाने नकाशे तयार केले. आणि मोजणी फी भरण्या संदर्भात नगरपंचायतला पत्र व्यवहार करण्यात आला.नगरपंचायतच्या नाकर्ते धोरणामुळे भोगवटा धारकांचा भुखंड कायम होवू शकला नाही. त्यामुळे गाव नमुना ८’अ’ नाही प्रधानमंत्री आवास योजनांचा लाभ कसा मिळणार हा गंभीर प्रश्न नांदगांव खंडेश्वर शहरातील भोगवटा धारकांचा आहे. संबंधीत विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र तातडीने जमा करून भूमी अभिलेख कार्यालयाची मोजणी फी भरुन गाव नमुना ८’अ’ मिळण्याचा मार्ग सुकर करावा व गावठाण विस्तार करून मागेल त्याला जागा उपलब्ध करुन द्यावी.अन्यथा येणाऱ्या पुढील काळात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने भोगवटा धारकांमध्ये जनजागृती करून जमिनीच्या हक्काचा लढा तिव्र करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे आपणास देत आहोत.माकप तालुका सचिव, शाम शिंदे, मोसिन शेख, महिंद्रा चौकडे, कान्तेश्वर पुंड, किशोर शिंदे, लक्ष्मीबाई सोळंके, लता बावीसथळे, शालू बावीसथळे, कल्पना सोळंके, जिजा राऊत, माला कोंडवते,आशा सोळंके, बबीता सुहागपुरे, सुमित्रा खानंदे, लीला सोनवणे, वंदना कोहळे, साहेबराव रावेकर यासह आदी उपस्थित होते