वंचिताच्या बाजूने माकपचा लाल झेंडा सतत संघर्षात राहणार – शाम शिंदे
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी शहर कमिटीच्या वतीने आज दिनांक २९/९/२०२५ सोमवार रोजी हक्काच्या प्रश्नाकरिता नगरपंचायत वर धरणे आंदोलन करण्यात आले. हक्काची तळजमीन नावे व्हावी, घरकुल मिळावे, शहरी रोजगार हमी योजना सुरू व्हावी, गावठाण विस्तार व्हावा याकरिता नांदगाव खंडेश्वर वासियांनी मोठ्या संख्येने एकत्र येत नगरपंचायत कार्यालयाच्या गेट समोर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
भोगवटाधारकांचा भूखंड कायम करून गाव नमुना आठ अ द्या, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, या घरकुल योजनांचा प्रत्येक गरजवंतांना त्वरित लाभ द्या, शहरी रोजगार हमी योजना सुरू करून मागेल त्याला जॉब कार्ड द्या, गावठाण विस्तार करून मागेल त्याला ३३+३३ चे प्लॉट द्या, तरुणांना रोजगार मिळावा याकरिता आरक्षित जागेत एमआयडीसी सुरू करा.धरणे आंदोलनाचे नेतृत्व माकपचे तालुका सचिव कॉम्रेड श्याम शिंदे शहर सचिव अब्दुल मोहसीन शेख यांनी केले.धरणे आंदोलनात जमलेल्या नागरिकांना संबोधित करताना श्याम शिंदे म्हणाले की आपल्या हक्काच्या तळजमिनीचा मुद्दा माकप सर्वप्रथम २०१५ साली एरेनियर आणला आणि सातत्यपूर्ण संघर्ष नंतर नजुल विभागाकडून संपूर्ण भोगवटाधारकांच्या मोजण्या करण्या स बाद्य केले. लाल झेंड्याच्या आणि नागरिकांच्या एकीच्या जोरावर आपला हक्काच्या गाव नमुना आठ अ मिळविण्याच्या दिशेने पाऊल पडले. ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. जोपर्यंत गाव नमुना आठ अ मिळणार नाही तोपर्यंत माकप लाल झेंडा स्वस्त बसणार नाही.कोणत्याही आजी-माजी नगरसेवकाच्या बडी पडू नये असे आव्हान यावेळी करण्यात आले.यावेळी ज्ञानेश्वर शिंदे, रामदास मते, अनिल मारोडकर, दीपक अंबाडरे, रुस्तम खा पठाण, राजीक शेख, कांतेश्वर पूड, वैदखा पठाण, रमेश काळेकर, शहेनशहा, भास्कर कुमरे, प्रकाश इकार, ज्ञानेश्वर मारोडकर,लक्ष्मीबाई सोळंके, मीरा कुमरे, लताबाई बाविस्तरे, लक्ष्मण झिमते, राजगुरू शिंदे, बहादुर खा पठाण, प्रवीण डोक, रेखा झिमटे , मनीषा दीप्ती, सुमन बावणे, यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
