चांदुरबाजार/एजाज खान
विजयादशमी व गांधी जयंतीच्या शुभमुहूर्तावर यहुवा इरे फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त धरमपेठ नागपूर येथील वसंतराव नाईक सभागृहात आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शंभर कर्तृत्ववान व्यक्तींना आदर्श पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले, प्रमुख अतिथी म्हणून बॉलीवूड अभिनेत्री एलिना तूतेजा, सिमरन अहुजा आणि विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या उपस्थितीत हा सन्मान करण्यात आला.या प्रसंगी गोष्टी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रा. प्रणित देशमुख यांना आदर्श पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रा. देशमुख हे शैक्षणिक क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी राज्यभर परिचित आहेत. त्यांनी शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती, बालरक्षक शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी उपक्रम, तसेच सामाजिक समस्या आणि पर्यावरणविषयक जनजागृतीसाठी विविध कार्य केले आहे.शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल यापूर्वीही अनेक संस्थांकडून त्यांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा शुभेच्छा दिल्या.
