
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांचा पुढाकार
अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
रक्षा बंधन हा उत्सव देशात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. राखिच्या या पवित्र सूत्रात भौतिक सुरक्षेसह सर्व प्रकारचे अवगूण,दोष आदीपांसून रक्षण हे अभिप्रेत आहे,असे प्रतिपादन प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय रहाट गाव केंद्राच्या ब्रह्मकुमारी नंदादीदी यांनी केले.विद्युत भवन येथे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे (दि.११) रोजी महावितरण विद्युत भवनातील अधिकारी,अभियंते व कर्मचारी यांना राखी बांधून “रक्षा बंधन” उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी मुख्य अभियंता अशोक साळुंके,अधिक्षक अभियंता दिपक देवहाते,दिपाली माडेलवार,डॉ. प्रीयल तोलाणी,सहाय्यक महाव्यवस्थापक रूपेश देशमुख,उपमुख्य औद्योगिक संबध अधिकारी मधुसूदन मराठे,प्रणाली विश्लेषक नितीन नांदुरकर,उपविधी अधिकारी प्रशांत लहाने,वरिष्ठ व्यवस्थापक सुर्यकांत फलटणकर,शिरिष शहासह अभियंते व कर्मचारी यांची उपस्थिती होती.यावेळी प्रजापिता ब्रह्मकुमारी नंदादीदी म्हणाल्या की,महावितरण प्रगतीच्या ऊर्जेचे केंद्र आहे,त्यामुळे या कार्यालयात ताण -तणावाचे वातावरण राहणे साहजिकच आहे,परंतू महावितरणमध्ये कार्यरत सर्वांनी आपले इनर पीस (आत्मिक शांती) वाढविले तर दैनंदिन ताण -तणाव कमी करता येते,त्यामुळे प्रत्येकांनी दिवसाचा एक तास स्वत:ला देवून ध्यान (मेडीटेशन)करण्याचे आवाहन केले.यावेळी डॉ.प्रीयल तोलाणी यांनीही रक्षा बंधनाचे महत्व सांगीतले,आणि सहज जीवन कसे जगावे याबाबत मार्गदर्शन केले.मुख्य अभियंता अशोक साळुंके यांनी मनोगत व्यक्त करत स्वत:वर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन केले.