ईव्हिएम द्वारे केले मतदान ; निवडणूक प्रक्रियेचा घेतला प्रत्यक्ष अनुभव
धामणगाव रेल्वे / तालुका प्रतिनिधी
आधुनिक पद्धतीने निवडणूक प्रचार यंत्रणा राबवून शांततामय मार्गाने निवडणूक घेण्याचा आदर्श तालुक्यातील वरूड बगाजी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी समाजासमोर आहे. शाळेतील प्रमुख विद्यार्थी-विद्यार्थिनींनी निवडणुकीत देशाच्या राजकारणाची झलक दाखवून दिली आहे. या मुलांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनात भ्रमणध्वनीतील मतदान यंत्राद्वारे प्रक्रिया यशस्वी केली.शाळेतच मुलांचा बौद्धिक विकास होतो व सामाजिक ज्ञान मिळते. अशाच विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थांना समाजातील प्रत्येक घटकांशी जोडण्याचा प्रयत्न तालुक्यातील वरूड बगाजी जिल्हा परिषद शाळा करीत आहे. याचाच एक भाग म्हणून शाळेतील निवडणुकीसाठी विद्यार्थांनी अर्ज सादर केले होते; उमेदवार विद्यार्थ्यांनी प्रत्येक वर्गात जाऊन मौखिक प्रचार केला.

त्यानंतर मुख्याध्यापक नरेंद्र काळे,शिक्षक राजेश चौधरी,रामदास पाटील,मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी पौर्णिमा गाडगे मार्गदशर्नाखाली कागदावर बॅनर, निवडणुकीच्या सर्व योजना व स्वत: मतदान केंद्रही तयार केले.या निवडणुकीत विद्यार्थ्यांनी भ्रमणध्वनीतील मतदान यंत्राद्वारे मतदान केले.लोकशाहीत मतदान प्रक्रिया कशी चालते याचा प्रत्यक्ष अनूभव देण्यात आला शाळेतील ऊपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी मतदान प्रक्रीयेत सहभाग घेतला.यात मुख्यमंत्री पदी अमन घोडाम तर सृष्टी भनारकर,दूर्गेश कोवे,आचल देशमूख,पूनम वानखडे,ऊत्कर्षा आत्राम हे विद्यार्थी मंत्रिमंडळासाठी निर्वाचित झाले.यानंतर या निर्वाचित विद्यार्थ्यांचा पदग्रहण सोहळा पार पडला.
