
विद्यापीठात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती साजरी
अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती मोठ उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन, हारार्पण करुन विद्यापीठाच्यावतीने अभिवादन केले. जयंती कार्यक्रमाला प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, ननसा संचालक डॉ. अजय लाड, विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर, रासेयो संचालक डॉ. निलेश कडू, उपकुलसचिव श्री मंगेश वरखेडे, सहा. कुलसचिव डॉ. साक्षी ठाकूर तसेच शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, विद्यापीठाचे अधिकारी, शिक्षक व कर्मचारी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते. संचालन व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याबद्दल माहिती जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांनी दिली.