
ड्रग डेव्हलपमेंट अँड अनीलिसिस विषयाची परीक्षा 7 जुलै रोजी होणार
विद्यार्थ्यांनी नोंद घेण्याचे विद्यापीठाचे आवाहन
अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची उन्हाळी-2025 बी.ई. (आर्टीफिशियल इंटेलिजन्स अॅन्ड डाटा सायन्स) सेमि-5 (सी.बी.सी.एस.) च्या सायबर सिक्युरिटी या विषयाची परीक्षा एम.एस. गोटे महाविद्यालय, वाशिम (केंद्र क्र. 721) या परीक्षा केंद्रावर 7 जुलै, 2025 रोजी दुपारी 2.00 ते 5.00 या वेळेत, बी.एस्सी. (होम सायन्स) फॅशन डिझायनिंग) सेमि-6 च्या सायन्टीफिक रायटिंग या विषयाची भारतीय महाविद्यालय, मोर्शी (केंद्र क्र.119) या परीक्षा केंद्रावर 7 जुलै, 2025 रोजी दुपारी 2.00 ते 5.00 या वेळेत आणि एम.एस्सी. (फार्मास्युटीकल केमेस्ट्री) सेमि-4 (सी.बी.सी.एस.) च्या ड्रग डेव्हलपमेंट अॅन्ड अॅनालिसीस या विषयांची परीक्षा 7 जुलै, 2025 रोजी सकाळी 9.00 ते दु. 12.00 या वेळेत घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेच्या वेळी विद्याथ्र्यांनी त्यांना देण्यात आलेले प्रवेशपत्र सोबत आणावे, असे परीक्षा व मूल्यमापन विभागाकडून कळविण्यात आले आहे.यासंदर्भात सर्वसंबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य, केंद्राधिकारी, महाविद्यालये, परीक्षा केंद्रांना कळविण्यात आले असून महाविद्यालयांनी याची तातडीने आपल्या विद्याथ्र्यांना जाणीव करुन द्यावी. तसेच विद्याथ्र्यांनी सुध्दा याची नोंद घ्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता विद्यापीठाच्या वेबसाईटवर परीक्षा विभागाच्या अधिका-यांच्या क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात येत आहे