
संशोधनकत्र्यांनी नोंद घेण्याचे विद्यापीठाचे आवाहन
अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची आचार्य पदवी कोर्स वर्क परीक्षा-2025 दि. 13 जुलै, 2025 रोजी सकाळी 11 ते दु. 2.00 या वेळेत विद्याभारती महाविद्यालय, अमरावती, सीताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला, जी.एस. विज्ञान कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगांव, अमोलकचंद महाविद्यालय, यवतमाळ व राजस्थान आर्यन कला, श्री मिठूलालजी कचोलिया वाणिज्य आणि श्री सत्यनारायणजी रामकृष्णजी राठी विज्ञान महाविद्यालय, वाशिम या पाच परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे.
परीक्षेचे प्रवेशपत्र संशोधन केंद्राचे लॉगीन आय.डी. मध्ये दि. 5 जुलै पर्यंत उपलब्ध होतील. आचार्य पदवी कोर्स वर्क परीक्षेच्या पाचही विषयाच्या प्रश्नपत्रिका नियोजित तारीख व वेळेच्या एक तास आधी प्युस सॉफ्टवेअर मधून ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच सदर विषयाच्या प्रश्नपत्रिका नियोजित वेळेत डाऊनलोड करुन विद्यार्थी संख्येनुसार झेरॉक्स करुन विद्याथ्र्यांना वितरीत करण्याची जबाबदारी परीक्षा केंद्राधिकारी व सहकेंद्राधिकारी यांची राहील. विषयांचे गुण संशोधन केंद्राचे लॉगीन आय.डी. मध्ये दि. 14 ते 21 जुलै पर्यंत प्राचार्य, केंद्र प्रमुख, विभाग प्रमुख यांनी भरावयाचे असून ऑफलाईन गुण स्वीकारले जाणार नाहीत. तसेच प्राचार्य, केंद्र प्रमुख, विभाग प्रमुख यांनी लॉगीन आय.डी. मध्ये गुण सादर न केल्यास येणा-या अडचणीस ते स्वत: जबाबदार राहतील, असे परीक्षा व मूल्यमापन विभागाकडून कळविण्यात आले यासंदर्भात सर्वसंबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य, केंद्र प्रमुख, विभाग प्रमुख, सर्वसंबंधित आचार्य पदवी संशोधन केंद्र यांना कळविण्यात आले असून संशोधन केंद्र प्रमुख यांनी याबाबत संशोधनकत्र्यांना अवगत करुन द्यावे, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता आचार्य कक्षाच्या उपकुलसचिव सौ. मिनल मालधुरे यांचेशी संपर्क साधता येईल, असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात येत आहे