
संशोधनात विद्याथ्र्यांना उज्ज्वल भविष्यासाठी मोठी संधी
अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील एम.एस्सी. (भौतिकशास्त्र) भाग-1 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून संशोधनामध्ये विद्याथ्र्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सुवर्ण संधी उपलब्ध होणार आहे.
*तीन दशकांपासून अध्यापन व संशोधनाची परंपरा*
भौतिकशास्त्र विभागात गेल्या तीन दशकांपासून दर्जेदार अध्यापन व संशोधनाची समृध्द परंपरा आहे. भौतिकशास्त्र विभागात प्रायोगिक व सैध्दांतिक शिक्षणाला विशेष महत्त्व देण्यात येते.
*संशोधनाशी निगडीत विषय*
विद्याथ्र्यांना क्वांटममेकॅनिक्स, इलेक्ट्रोडायनॅमिक्स, सॉलिड स्टेट फिजिक्स, न्यूक्लियर फिजिक्स, स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स यांसारख्या मूलभूत विषयांबरोबरच आधुनिक संशोधनाशी निगडीत विशेष विषय भौतिकशास्त्र विभागामध्ये शिकविले जातात. अभ्यासक्रमामध्ये प्रयोगशाळेतील सखोल प्रशिक्षण, सायंटिफिक इन्स्टØमेंट्स हाताळण्याचा अनुभव तसेच विविध प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विद्याथ्र्यांची सैध्दांतिक ज्ञानासोबत प्रायोगिक कौशल्ये विकसित केली जातात. विद्याथ्र्यांना संबंधित विषयाबाबतचे कौशल्य आत्मसात होण्यासाठी याबाबत विभागामध्ये व्हॅल्यू अॅडेड कोर्स सुध्दा शिकविल्या जाते.
*प्रतिष्ठेच्या फेलोशिप्स*
विभागातील विद्याथ्र्यांनी महाज्योती, सारथी यासारख्या प्रतिष्ठित फेलोशिप्स मिळवून विद्यापीठाचा नावलौकिक वाढविला आहे. तसेच विभागातील प्राध्यापकांना विविध राष्ट्रीय – आतंरराष्ट्रीय परिषदांमध्ये संशोधन सहयोग व्याख्याते म्हणून आमंत्रित केल्या जातात. त्यांच्या पेटंट, उच्च दर्जाची संशोधने, प्रकाशने, संदर्भ ग्रंथ हे महाराष्ट्रातील इतर विद्यापीठांच्या तुलनेत विशेष उल्लेखनीय आहेत.
*विद्याथ्र्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कार्यक्रम*
विद्याथ्र्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विभागाव्दारे वेळोवेळी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यशाळा, परिषदा व सायंटिफिक सेमिनारचे आयोजन केले जाते. त्यामुळे विद्याथ्र्यांना जागतिक स्तरावर चालणा-या संशोधनातील नवीनतम घडामोडींची माहिती मिळते. याशिवाय अनेक विद्यार्थी नेट, सेट, गेट अशा स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवून देशातील प्रमुख संशोधन संस्थांमध्ये प्रवेश घेत आहेत.
*अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर करिअरच्या मोठमोठ¬ा संधी*
एम.एस्सी. (भौतिकशास्त्र) अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोग, इस्त्रो, सी.एस.आय.आर., डी.आर.डी.ओ., बी.ए.आर.सी., आय.आय.एस्सी., टी.आय.एफ.आर., आय.आय.टी. अशा प्रतिष्ठित संस्था व संशोधन केंद्रांमध्ये विद्याथ्र्यांना करिअरच्या मोठमोठ¬ा संधी उपलब्ध होतात. तसेच खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, ऊर्जा, आयटी, शिक्षण, संरक्षण, अंतराळ संशोधन अशा क्षेत्रांमध्ये नोकरीच्या अमर्याद संधी आहेत.
*अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत*
विभागाने यापूर्वी अनेक विद्याथ्र्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन करून नेट, सेट, गेट, जेस्ट परीक्षेत घवघवीत यश मिळवून दिले आहे, त्यामुळे विद्यार्थी विद्यापीठे, महाविद्यालये, संशोधन संस्था, तसेच औद्योगिक क्षेत्रात प्राध्यापक, संशोधक, सल्लागार, शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी इच्छूक विद्याथ्र्यांनी भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. संदीप वाघुळे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठाच्यावतीने करण्यात येत आहे.