अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट एम-सेट परीक्षेत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील गृह विज्ञान विभागाच्या माजी विद्यार्थीनी डॉ. रविशा आंबेकर व कु. सीमा कदम यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे.

डॉ.रविशा आंबेकर यांनी एम.एस.सी (गृहविज्ञान) कम्युनिकेशन अँड एक्सटेंशन यात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. तसेच सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची पात्रता परीक्षा नेट देखील उत्तीर्ण केली आहे. पदव्युत्तर पदवी परीक्षेत प्रथम मेरिट असून त्यांनी आचार्य पदवी प्राप्त केली आहे. सद्यस्थितीत त्या शासकीय ज्ञान-विज्ञान संस्थेत तासिका तत्त्वावर शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे कार्य करीत आहे. कु. सीमा कदम एम.एस.सी ( गृहविज्ञान) फुड सायन्स अँड न्युट्रिशन विषयात पदव्युत्तर पदवीप्राप्त असून सद्यस्थितीत त्या एनआरसी, रूरल हॉस्पिटल मोखाडा, पालघर येथे आहारतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत.या यशाबद्दल कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे तसेच विभाग प्रमख डॉ. वैशाली धनविजय, डॉ. संयोगीता देशमुख, सुमित गेडाम, शिल्पा इंगोले, दिपाली भैसे, दिव्यानी नवले, आयतल कामदार, सुमेध वडुरकर, अनुश्री आडे, श्री. ए. डी. हिरे, श्री इंगळे यांनी अभिनंदन केले आहे.
