उपमुख्यमंत्री जथा नगर विकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांची उपस्थिती
मुंबई / मंत्रालय प्रतिनिधी
मुंबईच्या पश्चिमेच्या सीमेवरील दहिसर टोल नाका पुढे स्थलांतरित करण्याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत आज एक विशेष बैठक पार पडली. हा टोलनाका पुढे २ किलोमीटर अंतरावरील वर्सोवा पुलासमोरील नर्सरी जवळ स्थलांतरित करण्याचे या बैठकीत निश्चित करण्यात आले.

मुंबई महानगर क्षेत्रांत प्रवेश करताना मीरा-भाईंदरच्या वेशीवर असलेल्या दहिसर टोल नाक्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा त्रास होतो, तसेच इंधनाचाही अपव्यय होतो, प्रदुषणामुळे पर्यावरणाची देखील हानी होते.
त्यामुळे स्थानिक नागरिकांना दिलासा देण्यासाठी हा टोलनाका पुढे हलवण्याची गरज असल्याचे मत यावेळी मांडण्यात आले.

त्यानुसार, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ या बाबतचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठवेल, तो प्रस्ताव केंद्रीय वाहतूक मंत्रालयाकडून मंजूर होऊन आल्यानंतर टोलनाका स्थलांतरणाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. यासाठी एक ते दीड महिना वेळ लागेल. दिवाळीपूर्वी हा टोलनाका स्थलांतरित करण्याचे या बैठकीत निश्चित करण्यात आले.यावेळी आमदार प्रकाश सुर्वे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक मनोज जिंदल, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सुहास चिटणीस, वसई- विरार आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त निकेत कौशिक, IRB चे ठेकेदार विरेंद्र म्हैसकर आणि वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते
#Dahisar #TollNaka #Mumbai #EknathShinde
Pratap Sarnaik Prakash Surve – प्रकाश सुर्वे यांची उपस्थिती.
