
दोन आरोपींना करण्यात आली अटक
वरुड / तालुका प्रतिनिधी
वरुड शहरात एक संतापजनक घटना उघडकीस आली असून, ३२ वर्षीय महिलेला तिच्या चेहऱ्यावर तिखट फेकून, धारदार शस्त्राने जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी वरुड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 457/2025, कलम 109(1), 3(5) भारतीय नवीन दंड संहितेनुसार (BNS) दिनांक 10 जुलै 2025 रोजी नोंदवण्यात आला आहे.
हल्ल्याची थोडक्यात हकीकत अश्या प्रकारे आहे की,
फिर्यादी महिला, वय 32 वर्षे, जात – गोंड, व्यवसाय – मजुरी, रा. जुने चीरघरजवळ मिरची प्लॉट, वरुड ही नेहमीप्रमाणे कामावरून घरी परतत असताना, दोन अज्ञात इसमांनी तिचा पाठलाग केला. तिला अचानकपणे अडवून चेहऱ्यावर तिखट फेकले व धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन खालील दोन संशयितांना दिनांक 12 जुलै 2025 रोजी अटक केली आरोपीचे नाव रोषन बाळू रामटेके, (वय – 25) वर्ष, जात – महार, व्यवसाय – मजुरी, रा. अन्नपूर्णा नगर, वरुड,जम्मू उर्फ जमीर मेहबुब शहा,( वय – 28 वर्ष,) व्यवसाय – मजुरी, रा. सती चौक, वार्ड क्र. 07, वरुड असून त्यांना अटक करण्यात आली आहे. सदर तपासात उघडकीस आले की, आरोपी क्र. 1 रोषन रामटेके याच्या वडिलांचे आणि पीडित महिलेचे अनैतिक संबंध असल्याचा त्याला संशय होता. यामुळे त्यांच्या घरी वारंवार भांडणे होत होती. त्याच रागातून रोषन याने आपल्या मित्र जम्मू उर्फ जमीर शहाच्या मदतीने पीडितेवर हल्ला केला.सदर गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक श्री अर्जुन ठोसरे यांच्या नेतृत्वाखाली व पोलिस अधीक्षक मा. श्री विशाल आनंद, अपर पोलिस अधीक्षक श्री पंकज कुमावत आणि उपविभागीय पोलिस अधिकारी मोर्शी श्री संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.या कारवाईत API शिवहरी सरोदे, PSI प्रमोद काळे, PSI मडावी, HC सचिन भगत, पोलिस कर्मचारी किरण दहिवडे, सागर शिवणकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.सदर प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.