
जनावरे चोरीला आळा न घातल्याने वणी येथील शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन
प्रशासकीय अधिकारी यांचे मात्र आश्वासन
चांदूर बाजार /सुयोग गोरले
चांदुर बाजार तालुक्यातील वणी बेलखेडा गावातील गेल्या अनेक दिवसांपासून चोरी प्रमाण वाढले आहे या मध्ये अनेक गोर गरीब गरजू कुटुंबातील 21 शेतकऱ्याचे आजपर्यंत ८५ जनावरे चोरीला गेलेली असून अद्यापपर्यंतसुद्धा ब्राम्हणवाहा थडी पोलिस स्टेशनने कोणतीही कार्यवाही केली नसल्यामुळे वणी (बेलखेडा) गावातील शेतकरी मुकेश अलोने ,यांच्यासहित नागरिकानी तात्काळ कारवाई करून न्याय मिळण्यात यावा, याकरिता बेमुदत अन्नत्याग आंदोलन २७ जूनपासून वणी येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरु केले आहे.
तालुक्यातील ब्राह्मणवाडा थडी पोलिसस्टेशन अंतर्गत येत असलेल्या वणी बेलखेडा या गावातील अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांच्या जनावरांची मोठचा प्रमाणात चोरी होत असून यामध्ये बैलजोडी, गाई, शेळी, म्हशी, शेतामधील साहित्य इत्यादी सर्व प्रकारच्या एकूण ८५ जनावरांची आजपर्यंत चोरी झाली आहे. या चोरीच्या प्रकारांमुळे शेतकरी लोकांचे हजारो ते लाखो रूपयांचे नुकसान झालेले आहे. या सर्व प्रकारची माहिती गावकऱ्याऱ्यांनी ब्राह्मणवाडा पोलिसस्टेशन, अमरावती ऑफिस यांना वारंवार देवूनसुद्धा पोलिसस्टेशनने कोणतीही कार्यवाही केलेली नाही, तसेच कोणत्याही प्रकारची चौकशी केलेली नाही.तर १ मे २०२५ रोजी मुकेश अलोणे यांच्या गोटफार्ममधील ८ बकऱ्या चोरीला गेल्या असून दीड लाख रूपयांचे नुकसान झाले. यासंबंधित पोलिस स्टेशन यांना माहिती देवूनसुद्धा कोणतीही कार्यवाही केलेली नाही. सदर घटनेबाबत गावकऱ्यांनी खा. अनिल बोंडे यांना यांच्याकडे तक्रार दिली असता त्यांनी पोलिस अधीक्षक, अमरावती ग्रामीण यांना कार्यवाही करण्यास सांगीतलेः परंतु अद्यापसुद्धा कार्यवाही किंवा चौकशी न करता खा. अनिल बोडे यांच्या पत्राला सुद्धा जणूकाही पोलिस स्टेशनने केळाची टोपली दाखवली की काय, असे दिसून येत आहे.
१० दिवसात तपास करतो किंवा कार्यवाही करतो, असे विश्वास देवूनही १ महिना झाल्यानंतर या चोरीचा किंवा या आधीच्या चोरीचा कोणताही तपास झालेला नाही. पोलिस प्रशासन कामात दिरंगाई करत असल्यामुळे एका बाजूने शेतकरी लोकांचे नुकसान होत आहे, तर दुसऱ्या बाजूने चोरांना अभय मिळत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात चोरीच्या घटना वाढण्याची शक्यता आहे. आधीच मरणासन अवस्थेत असलेल्या शेतकरी लोकांना असलेला जनावरांचा आधारसुद्धा चोरीच्या घटनामुळे हिरावत चाललेला आहे. त्यामुळे शेतकरी लोकांचे मनोधैर्य खचून आमहत्येस प्रवृत्त होऊ शकतो. ज्या शेतकरी लोकांची जनावरे आतापर्यंत चोरीला गेली, त्यांना अद्यापपर्यंतसुद्धा कोणताही न्याय न मिळाल्यामुळे अखेर वणी (बेलखेडा) येथील मुकेश अलोने, आशिष पाटील, मुकेश पाटील , गुणवंत अलोने यांच्यासहित नागरिकांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे तीन दिवस होऊन सुद्धा अन्नत्याग सुरूच आहे मागण्या तात्काळ पूर्ण झाल्यास याच ठिकाणी आमचा जीव गेला तरी आम्ही मागणा पुन्हा झाल्या शिवाय मागे हटणार नाही अशी गावकरी व शेतकऱ्यांचे मागणी करण्यात आली आहे.