
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी
नांदगाव पेठ / प्रतिनिधी
अमरावती जिल्हा ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थी यांना देण्यात येणारा निधी हा शहरी घरकुल बांधकामाच्या धर्तीवर कमी असून शहरातील घरकुल लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणाऱ्या निधीच्या तुलनेत ग्रामिण भागातील घरकुल लाभार्थ्यांना देण्यात यावा अशी मागणी भाजपाचे दिनकर सुंदरकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. शहरातील व ग्रामीण भागातील घरकुल बांधकामा करिता लागणारे विविध मटेरियलचे भाव सारखेच असून शहरी भागात देण्यात येणारा घरकुलचा निधी हा ग्रामीण भागाच्या तुलनेत जास्त असल्याने ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना शहरी भागाप्रमाणेच निधी उपलब्ध करून द्यावा जेणेकरून ग्रामीणj भागातील लाभार्थ्यांचे घर व्यवस्थितरित्या बांधकाम करता येईल म्हणून राज्य सरकारने याविषयीं दखल द्यावी अशी मागणी दिनकर सुंदरकर यांनी केली आहे.