
विकसित भारत संकल्प अभियान अंतर्गत माऊली चोर येथे खरिप पूर्व गाव बैठक संपन्न
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
विकसित भारत संकल्प अभियान अंतर्गत तालुक्यातील माऊली चोर येथे खरिप पूर्व गाव बैठकीचे आयोजन करण्यात आले सदर विकसित भारत संकल्प अभियान तालुक्यातील शेतकऱ्यांपर्यंत खरीप व रब्बी पिकाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी तालुका कृषि अधिकारी नांदगाव खंडेश्वर व कृषि विज्ञान केंद्र दुर्गापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज माऊली चोर येथे गाव बैठकीचे आयोजन करण्यात आले सदर गाव बैठकीमध्ये केवीके येथील डॉक्टर श्री पाल , डॉक्टर श्री जायले, डॉक्टर श्री आखूड इत्यादी शात्रज्ञ यांनी विविध शेती विषयांवर मार्गदर्शन केले . सदर कार्यक्रमांमध्ये शासनाच्या विविध योजना तसेच खरीप व रब्बी पिकांचे तंत्रज्ञान विषयी माहिती शेतकरी बांधवांना शास्त्रज्ञ यांच्यामार्फत देण्यात आली डॉक्टर पाल यांनी जमिनीचे आरोग्य याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले तसेच डॉक्टर श्री जायले यांनी पीक व्यवस्थापन याबद्दल सविस्तर असे मार्गदर्शन केले. त्यानंतर बियाणे बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक व सोयाबीन उगवण क्षमता प्रात्यक्षिक घेण्यात आले.
तसेच तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव यांनी ॲग्रीस्टॅक मध्ये नोंदणी करून आपला फार्मर आयडी काढण्याचे आव्हान सदर अभियान अंतर्गत करण्यात आले.सदर कार्यक्रमाला गावचे उपसरपंच श्री राजेंद्र सरोदे , उप कृषि अधिकारी श्री. गावंडे , सहायक कृषि अधिकारी श्री लाडके , आत्माच्या सौ. प्रेरणा भोयर, शिवाजी कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर श्री पाटील व त्यांचे विधार्थी व गावातील मोठ्या प्रमाणावर शेतकरी बांधव कार्यक्रमाला उपस्थित होते.