
आदिवासी विकास आयुक्तालयाच्या https://tribal. maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध
अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग अमरावती विभागातील गृहपाल (पुरुष), गृहपाल (स्त्री) या पदाची मूळ दस्तावेज/कागदपत्र पडताळणी दि. 30 मे 2025 रोजी सकाळी 11 वाजता अपर आयुक्त आदिवासी विकास अमरावती यांचे कार्यालय पोलीस आयुक्त कार्यालय जवळ, टीबी हॉस्पिटलच्या मागे अमरावती या ठिकाणी होणार आहे.त्यानुषंगाने कागदपत्रे पडताळणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन सादर केलेला अर्ज व ऑनलाईन अर्जात केलेल्या दाव्यांच्या अनुषंगाने सर्व मूळ दस्तावेज/कागदपत्रे व दोन सेट छायांकित प्रतीसह नमूद तारखेस व वेळेला उपस्थित रहावे, असे अपर आयुक्त तथा प्रादेशिक निवड समितीचे अध्यक्ष जितेंद्र चौधरी यांनी जाहीर सूचनेद्वारे कळविले आहे.कागदपत्रे पडताळणीसाठी पात्र ठरलेल्या (लेखी परीक्षेत 45 टक्के गुण प्राप्त उमेदवार) उमेदवारांची यादी.आदिवासी विकास आयुक्तालयाच्या https://tribal. maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.* प्रसिद्ध केलेल्या यादीतील उमेदवारांचा समावेश म्हणजे आदिवासी विकास आयुक्तालयाद्वारे नोकरीची हमी नव्हे, याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी, असेही प्रादेशिक निवड समितीद्वारे कळविण्यात आले आहे.