
आझाद व्यवसाय सुविधा केंद्र व अमरावती अक्षर मानवचा संयुक्त उपक्रम
तिवसा /तालुका प्रतिनिधी
समाज आणि कुटुंब दुरुस्त झाली पाहिजे, मानवी समाजाची सर्व व्यवस्था बदलली पाहिजे.म्हणून आझाद व्यवसाय सुविधा केंद्र, तिवसा व अक्षर मानव अमरावती जिल्हा कार्यकारिणी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 17 जुलै (गुरुवार ) 2025 रोजी दिवाणी न्यायालय समोर तिवसा, ता. तिवसा, जिल्हा अमरावती. येथे आहारशास्त्र, आरोग्यशास्त्र, आर्थिक स्थैर्य, महिला स्वयंसहाय्यता, महिला आर्थिक स्वातंत्र्य, एकल महिला, एकल महिलांचे रोजगार आणि त्यांच्या मुलांचे प्रश्न, ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, उद्योग व्यवसाय मार्गदर्शन, अश्या एकनाअनेक विषयावर मोफत मार्गदर्शन केले जाईल.
सर्व सेवाभावी संस्था यांना अक्षर मानव राबवत असलेल्या राज्यभरातील मानवी उपक्रम बाबत माहिती मिळेल ती माहिती देण्यासाठी महाराष्ट्र अक्षर मानवचे राज्य संघटक श्री आझाद खान उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहे.मुलं कशी घडवायची, मुल कशी वाढवायची, जोडीदाराचे प्रश्न तसेच महिलांचे सर्व समस्यावर मार्गदर्शन करण्यासाठी आर्वीच्या समाजसेविका प्रांजली ताई आत्राम आवर्जून उपस्थित राहतील. बेरोजगार तरुण -तरुणी यांना करिअर विषयक तसेच स्पर्धा परीक्षा विषयावर मोफत मार्गदर्शन करण्यासाठी आयडियल अकॅडमीचे अमरावतीचे संचालक प्रा. शिवाजी कोकाटे हे मार्गदर्शन करणार आहेत. प्रत्येकाला वाटतें आपणं आणि आपले कुटुंब निरोगी राहिले पाहिजे. बदलत्या जीवनशैलीमुळे मनुष्याची आहार पद्धती बदलली आहे पर्यायाने माणूस अनेक आजारांना सामोरे जात आहे. आपलीं रोजची आहाराची रोजनिशी कशी असावी या वर सखोल मार्गदर्शन आझाद व्यवसाय सुविधा केंद्र व अक्षर मानव अमरावतीच्या पदाधिकारी उपस्थित राहुन करतील.गुरुवारी तिवसा येथे मानवीय हितासाठी अनेक वेगवेगळ्या विषयावर एक दिवसीय शिबीर मोफत आयोजित केले आहे. नावनोंदणी साठी या मो. 9766096906 क्रमांक वर संपर्क करु शकता. अमरावती जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे.