अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय संकुलन व जिल्हा क्रीडा परिषद अमरावती द्वारा 6 ऑक्टोंबर 2025.रोजी आंतर जिल्हा विभाग क्रीडा स्पर्धा श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये टायटन्स पब्लिक स्कूलचा विद्यार्थीनी नेत्रदीप प्रदर्शन करून नारायणदास लड्डा एस. एस .एफ बडनेरा व होली क्रॉस मराठी या तिन्ही शाळांना नमवून विजय प्राप्त केला कामगिरीच्या बळावर त्याची मलकापूर येथे होणाऱ्या विभागीय स्तरावर 17 वर्ष वयोगटातील लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा होणाऱ्या क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विद्यार्थिनींआपल्या यशाचे श्रेय टायटन पब्लिक स्कूलचे प्राचार्य डॉ.अजय चौबे क्रीडा शिक्षक निलेश फुलंबरकर आणि मार्शल आर्ट प्रशिक्षक जफर खान यांना दिले या यशाबद्दल नक्षत्रचे विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटी अमरावती चे अध्यक्ष मा. डॉ नितीनजी धांडे, उपाध्यक्ष मा. ॲड. उदयजी देशमुख, कोषाध्यक्ष मा. प्रा. (डॉ.) हेमंतजी देशमुख, सचिव मा. श्री. युवराजसिंगजी चौधरी , संचालक मंडळातील कार्यकारी सदस्य मा. श्री. नितीनजी हिवसे, मा. डॉ. सौ. पुनमताई चौधरी. मा. श्री.पंकजजी देशमुख . मा. श्री .प्रो विनय घोहाड. मा श्री प्रा . गजानन काळे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या मुलांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
