
पावसाचा दिवस म्हणजे लहानग्या साठी नेहमीच मजेशीर
पावसाचा दिवस हा मुलांसाठी नेहमीच मजेशीर असतो. हीच बाब लक्षात घेऊन विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी अमरावती व्दारा संचलित टायटन्स पब्लिक स्कूल अ स्पेशल युनीट ऑफ किंडरगार्टन वाटिका स्कूल मध्ये रेनी डे विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने साजरा केला. यावेळी सर्व विद्यार्थी रेनकोट आणि छत्र्या घेऊन आले होते. विद्यार्थ्यांना परिसर अभ्यासा अंतर्गत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.विदयाथ्यांनी पावसात नाचत बागडत पावसाचा आनंद लुटला.