अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
टायटन्स पब्लिक स्कूल अ स्पेशल युनीट ऑफ किंडरगार्टन वाटिका अमरावती येथे शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त दांडिया गरबा नृत्य महोत्सव साजरा करण्यात आला.

नवरात्र म्हणजे नऊ दिवस चालणारा सृजनाचा उत्सव. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, आश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना होते. मडक्यामध्ये धान्य पेरले जाते.त्यावर अखंड नंदादीप लावला जातो. रोज फुलांची माळ, सकाळ-संध्याकाळ आरती, हे सारे केले जातात., ‘सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते’ अशी तिची प्रार्थना केली जाते. या नवरात्र उत्सवानिमित्त टायटन्स पब्लिक स्कूल अ स्पेशल युनीट ऑफ किंडरगार्टन वाटिका अमरावती येथे गरबा आणि दांडिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला नवदुर्गांच्या वेशात आलेल्या विद्यार्थिनींच्या हस्ते दुर्गा मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर विद्यार्थिनींनी नवदुर्गांची वेशभूषा करून नवरात्रीतील प्रत्येक दिवशी दुर्गा मातेच्या कोणत्या रूपाची पूजा करावी, याची माहिती सांगितली. यावेळी दुर्गामाता स्तोत्रांचे गायनही करण्यात आले. शाळेतील महिला शिक्षिकांनी महिषासुरमर्दिनी मातेचे गीत गायन करून गरबा व दांडिया खेळाला सुरुवात केली. नवदुर्गेच्या विविध रूपात यावेळी चिमुकल्यांनी उत्साहात सहभाग घेतला. याप्रसंगी संगीताच्या तालावर विद्यार्थ्यांनी ठेका धरला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.यावेळी शाळेतील विद्याथ्यांनी गरबा आणि दांडियात सहभागी होत एकच जल्लोष करत नवरात्रोत्स उत्साहात साजरा करण्यात आला.
