श्रीक्षेत्र माहूर/संजय घोगरे
अश्विन शुद्ध तृतीयेला नांदेड येथील विजया जामकर यांच्या पद्मजा भजनी मंडळाने ललाटी भंडार हे गोंधळी नृत्य गाऊन रसिक भक्तांच्या टाळ्या घेतल्या.

तिसऱ्या माळेला सकाळी 11 वा.संजय काण्णव यांचे हस्ते संगीत रजनीचा शुभारंभ करण्यात आला. नांदेड येथील पद्मजा भजनी मंडळाच्या नेहा प्रवीण खडकीकर, प्रेरणा प्रवीण खडकीकर,उर्वशी प्रवीण खडकीकर व नंदिनी पद्मजा जाधव यांनी ललाटी भंडार, आईचा गोंधळ व मायभवानी गाण्यावर गोंधळी नृत्य सादर केले.दुसऱ्या सत्रात रेणुका महिला मंडळ माहूरच्या केदार नागदेव,रेणुका काण्णव, सीमा जोशी, वृषाली देशपांडे, मंंजिरी काण्णव, शुभांगी आमले, रंजना जगत,राजश्री काण्णव व शीतल केदार यांनी ये मयुरावरती बसून शारदे, गुरुदेवा तुम्ही या हो, ये अंबे भजनाला, तुला डोईवर घेईन, ये गं अंबे घटात बैसाया व रेणुका दर्शनाला बाई चालत ये गं अशी सुरेख भजने गाऊन रसिक भक्तांना मंत्रमुग्ध केले.संजय काण्णव यांनी सेवा दिलेल्या कलाकारांचा सन्मानपत्र देऊन सन्मान केला.या संगीत रजनीचे सूत्रसंचलन निलेश केदार गुरुजी यांनी केले.
