
सामाजिक कार्यकर्ते किरण होले यांचे उपमुख्य कार्यकारी अभियंता यांना निवेदन
दर्यापूर / रामेश्वर माकोडे
दर्यापूर तालुक्यातील थिलोरी ते गणेशपुर या रस्त्याचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत सन 2022 ,23 या काळात करण्यात आले आहे. मात्र बांधकाम होऊन दोन वर्ष सुद्धा होत नाही तर आज या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे .या रस्त्याने दररोज शेकडोच्या संख्येने नागरिक वाहने घेऊन व पायी प्रवास करतात. मात्र रस्ता निकृष्ट दर्जाचा झाला असून या रस्त्याने चालण्यासाठी आता ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
शासनामार्फत 71 लाख रुपये खर्च करून या रस्त्याचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र बांधकाम करताना ठेकेदार रावसाहेब सदाशिव बोबडे यांनी या रस्त्याच्या बांधकामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केलेला आहे. गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते किरण होले यांनी केलेला आहे . कारण या आधी सुद्धा रस्त्याचे बांधकाम सुरू असताना संबंधित ठेकेदाराच्या विरोधात तक्रार देण्यात आली होती मात्र त्यावेळेस अधिकाऱ्यांनी त्या तक्रारीची कुठलीही दखल घेतली त्यामुळे आज या रस्त्याचे निकृष्ट बांधकाम झाल्याचे चित्र समोर आलेले आहे . या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन निकृष्ट झालेल्या बांधकामाची पाहणी करावी व तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करावी व संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कार्यवाही करावी अन्यथा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करावे लागेल असे निवेदन सामाजिक कार्यकर्ते किरण होले यांनी 14 ऑगस्ट रोजी दर्यापूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अभियंता यांना दिले आहे . आता या निवेदनाची दखल संबंधित अधिकारी घेणार का व निकृष्ट झालेल्या रस्त्याचे बांधकाम पुन्हा होणार का तसेच ठेकेदारावर काय कारवाई होणार हे सुद्धा पाहण्याचा महत्त्वाचे ठरणार आहे.थिलोरी ते गणेशपुर या रस्त्याचे बांधकाम सन 2022 23 साली करण्यात आले रस्त्याचे बांधकाम सुरू असताना अतिशय निकृष्ट दर्जाचे सिमेंट व रेतीचा वापर करण्यात आला या संदर्भात मी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार सुद्धा दाखल केली होती. मात्र त्या बांधकामाची दखल अधिकाऱ्यांनी घेतली नाही. त्यामुळे आज ठेकेदाराने केलेल्या निकृष्ट बांधकाम हे दिसून आले आहे .आज गावकऱ्यांना रस्त्याने येण्या-जाण्याकरिता मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे .प्रशासनाने या गंभीर बाबीची तात्काळ दाखल घ्यावी अन्यथा नाईलाज प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करावे लागेल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते किरण होले यांनी दिला आहे.