महिला नगरसेविकेच्या नातेवाईकांनी सह्या केल्यास होणार कारवाई
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
महिला नगरसेविकेच्या अधिकारांचे संरक्षण आणि पती/नातेवाईकांकडून होणाऱ्या अधिकारांच्या वापरास/सही करण्यावर आक्षेप घेणे बाबत.नांदगाव खंडेश्वर नगर पंचायतचे प्रभाग क्रमांक १४ या प्रभागातुन निवडून आलेल्या नगरसेविका सौ.प्रांजली राहुल गुल्हाने यांनी मुख्याधिकारी यांना पत्र व्यवहार करुन सदर मुद्दा उपस्थित केला आहे. याबाबत सविस्तर असे की, माहिती नुसार आजच्या काळात , काही प्रकरणांमध्ये किंवा कामकाजामध्ये जनतेने निवडुन दिलेल्या महिला नगरसेविकांच्या अनुपस्थितीत अथवा माहितीशिवाय पती नगरसेविका पदाचा किवा त्यांते अधिकारांचा वापर करत असल्यास किंवा त्यांच्या वतीने कागदपत्रांवर सह्या करत असल्याचे. आढळल्यास याबाबत माहिती अशी की, भारतीय संविधानानुसार आणि संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार, निवडून आलेली लोकप्रतिनिधी म्हणून सर्व अधिकार आणि जबाबदाऱ्या केवळ निवडुण आलेल्या लोक नियुक्त महिला नगरसेविकांच्या कडेच असतात,पत्नीच्या वतीने सही करण्याचा किंवा कोणताही अधिकृत निर्णय घेण्याचा अधिकार पतीला किंवा इतर कोणत्याही नातेवाईकाला नाही.त्यामुळे, भविष्यात कोणत्याही शासकीय पत्रावर, बैठकीच्या इतिवृत्तावर किंवा इतर कोणत्याही अधिकृत कागदपत्रावर महिला नगरसेविंकाच्या व्यतिरिक्त इतर कोणाचीही सही स्वीकारली जाऊ नये.नगरसेविकांच्या अधिकारांचा गैरवापर थांबवण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रात येणारे संबंधित विभागांना तात्काळ सूचना देण्यात याव्यात.ही बाब अत्यंत गंभीर असून, महिला लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवक हे शासकीय अधिकारी (Gazetted Officer) नसतात: नगरसेवक हे जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी असतात, शासकीय कर्मचारी नाहीत. त्यामुळे त्यांना कागदपत्रे attest (साक्षांकित) करण्याचा अधिकार नसतो. अधिकार वैयक्तिक असतो: सही करण्याचा किंवा attest करण्याचा अधिकार हा संबंधित व्यक्तीला (मग तो शासकीय अधिकारी असो किंवा नगरसेवक) त्याच्या पदाच्या आणि कायद्याने दिलेल्या मर्यादेत असतो. हा अधिकार नातेवाईकाकडे हस्तांतरित करता येत नाही.
कायदेशीर तरतूद: कोणत्याही अधिकृत शासकीय किंवा निम-शासकीय कामासाठी, केवळ कायद्याने अधिकृत व्यक्तीच सही किंवा शिक्का वापरू शकते. नातेवाईकाने केलेली सही कायदेशीररित्या वैध मानली जाणार नाही आणि अशा कृतीमुळे कायदेशीर कारवाई होऊ शकते.नगरसेवकाच्या अनुपस्थितीत त्यांच्या घरातील सदस्याने (नातेवाईकाने) कागदपत्रांवर सही करणे हे बेकायदेशीर आहे आणि ते कायद्याने मान्य केले जात नाही. ही बाब अत्यंत गंभीर असून, महिला लोकप्रतिनिधी म्हणून माझ्यासह सर्वांचे कायदेशीर अधिकारांचे संरक्षण करणे आवश्यक असल्याची मागणी एका लेखी निवेदनाव्दारे नगरसेविका सौ.प्रांजली राहुल गुल्हाने यांच्या कडुन करण्यात आली आहे.
