दत्तापूर पोलिसांनी सर्व आरोपींना केले जेरबंद
धामणगाव रेल्वे/ गजानन फिरके
पोलीस स्टेशन दत्तापूर येथे डॉक्टर आकाश येंडे यांनी माहिती दिली कि मृतक नामे गणेश उर्फ शुभम गजानन वारंगणे, वय वर्ष 26 रा.नारगांवडी यास मृत अवस्थेत दाखल केले आहे.व पो.स्टे.ला अकस्मात मृत्यू क्र.४३/२५/ कलम १९४ कलम बिएन एस एस प्रमाणे दाखल करून चौकशीत घेण्यात आला होता.सदर अकस्मात मृत्यूचे चौकशी दरम्यान यातील मृतक नामे गणेश उर्फ शुभम गजानन वारंगणे यास दत्तापूर येथील मनोज कीर्तने ,रा.जुना धामणगाव यांची व मृत्यूची आई नामे दुर्गा गजानन वारंगणे यांच्यात प्रेम संबंध होते. व त्या दोघांमध्ये यातील मृतक मुळे प्रेम संबंधात अडथळा निर्माण होत असल्याचे यातील आरोपी नामे मनोज कीर्तने, मृताची आई श्रीमती दुर्गा वारंगणे यांनी मृतकचा काटा काढण्याचे ठरविले. व अमोल सुरेश अर्जुने रा. जुना दत्तापूर व अशोक उर्फ चिवडा व्यंकटराव चवरे, वय वर्ष ६५ रा. नारगावंडी याचे मदतीने मृतक यास दि.७/१०/२०२५ रोजी सकाळी अंदाजे १० /०० वाजताचे सुमारास आरोपी मनोज कीर्तने याने मृतक यास मोटरसायकलवर बसवून घेऊन अमोल सुरेश अर्जुने,रा.जूना दत्तापूर व अशोक व्यंकटराव चवरे यांना सोबत घेऊन असेगाव शेत शिवारात शितल गुप्ता यांच्या शेतातील पडितात नेऊन मृत्यूचे हात व पाय दोरीने बांधून त्यास हातावर, पायावर व शरीरावर इतर ठिकाणी मारहाण करून गंभीर जखमी केले. त्या मारहाणीत मृतक चा मृत्यू झाला.त्यावरून आरोपी विरुद्ध मयताचे मामा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पो.स्टे. दत्तापूर येथे गुन्हा क्रमांक.२२७/२५ कलम १०३(१),२३९,३(५) बिएन एस प्रमाणे गुन्हा दाखल करून तपासात घेण्यात आला. सदर गुन्ह्याचे तपासात दत्तापूर पोलिसांनी वरील नमूद चारही आरोपींना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता आरोपीतांनी गुन्हा केल्याचे कबुली दिल्याने त्याची रितसर अटक कार्यवाही करून गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक गिरीश थातोड ठाणेदार पो.स्टे. दत्तापूर करीत आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद. अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, यांच्या मार्गदर्शनात पो.नि. गिरीश थातोड, सपोनी गजानन गजभारे, पोउपनी पुंडलिक चव्हाण, पोहेकॉ अतुल पाटील/१३५२,पोहेकॉ हरिहर वैद्य/२१८३,पोहेकॉ दीपक पंधरे/१९८७, पोहेकॉ सागर कदम/१८१८,पोहेकॉ नवनाथ खेडकर,ब.न.२१२३ नपोका पवन हजारे, ब.नं.१८८७, मपोका किरण पवार ब.नं.८३२, मपोका नीलिमा खडसे,ब.नं.१९७६,पो.का. मयूर ढवक,ब.नं.६५० चापोका पियुश चौबे यांनी केली.
