संभाजी ब्रिगेडची मागणी
अंजनगाव सुर्जी / मनोहर मुरकुटे
गेल्या दिड महिण्यापासून संपूर्ण महाराष्ट्र अतिवृष्टीने त्रस्त झाला आहे. यात आलेल्या महाभयंकर पुरामुळे सर्व ग्रामीण भाग व शेती आणि शेतकरी अडचणीत सापडून हवालदिल झाला आहे.महाराष्ट्राच्या कित्येक भागात शेतकऱ्यांची पिके तर संपूर्णपणे उध्वस्त झालेली आहेतच परंतु पुराच्या पाण्यामुळे शेत जमीन सुद्धा खरडून गेली आहे.त्यामुळे शासनाने संपुर्ण महारिष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करुन राज्यात सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी यासाठी संभांजी ब्रिगेड अंजनगाव सुर्जी तर्फे आमदार गजानन लवटे तसेच तहसीलदार यांच्यां मार्फत मुख्यमत्र्यांना निवेदन दिले आहे.सततच्या मुसळधार पावसाने गावेच्या गावे पुराखाली गेलेली असल्यामुळे कुटुंबच्या कुटुंब उध्वस्त झाले आहेत.तसेच,जनावरे आणि गुरेढोरे मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडले आहेत.शेती सोबतच घरदार,संसाराला लागणारे सर्व साहित्य आणि मुलांच्या शैक्षणिक साहित्याचे या पुराच्या पाण्यात अतोनात नुकसान झाले आहे.. हातामध्ये आलेले पीक पूर्णपणे वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांची जगण्याची उमेद कमजोर झाली आहे.चारही बाजूंनी तो भयानक संकटात सापडलेला असून येणाऱ्या काळात निराशा आणि नुकसानीमुळे आत्महत्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून हेक्टरी एक लाख रूपये व गुराढोरांच्या बाजार किंमती प्रमाणे मदत करत त्यांना धीर द्यावा”.* सरकारने बाकीच्या लोकप्रिय योजनांवर काही काळ अंकुश लावून सध्याची प्राथमिकता ही फक्त आणि फक्त अतिवृष्टी आणि पुरामुळे संकटात सापडलेल्या लोकांना जास्तीत जास्त सहकार्य अशा आशयाचे निवेदन संभाजी ब्रिगेड तर्फे देण्यात आले.यावेळी निवेदन देतांना तालुका अध्यक्ष शरद कडू, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ता प्रेमकुमार बोके,शहर अध्यक्ष राजेश शिंगणे,मराठा सेवा संघाचे तालूका आध्यक्ष बाळासाहेब गोंडचवर,ज्ञानेश तुरखडे,रमेश सावळे,रामेश्वर पाखरे,सिद्धार्थ सावळे वृषभ ठाकरे,राहुल उके,डाँ.प्रकाश भदे,निलेश ढगे,रोहीत कान्हेरकर,अंकुश खाडे,गजानन टेकाडे बाळासाहेब हिंगणकर सह संभाजीब्रिगेडचे कार्यकर्ते आणी शेतकरी उपस्थित होते.
