
वयोगट १४ व १७ मुला मुलींचे तीन संघ विजयी
नेर परसोपंत /वसिम मिर्झा
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषदे द्वारा तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये दि इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुला मुलींच्या खो-खो संघांनी विजय मिळवला.तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेमध्ये वयोगट १४ व १७ मुला मुलींच्या तीन संघांनी अंतिम सामन्यांमध्ये श्रीराम इंग्लिश मीडियम स्कूल नेर, शांतिनिकेतन हायस्कूल नेर व किसनराव नाईक विद्यालय पिंपळगाव डुब्बा या संघांना नमवून राळेगाव येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत प्रवेश केला आहे.प्रशिक्षक क्रीडाशिक्षक .प्रा. सुचित अक्कलवार यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी हे यश प्राप्त केले आहे. या सामन्यांमध्ये प्रा. श्रीराम चव्हाण व प्रा. नरेंद्र राठोड यांनी पंच म्हणून भूमिका निभावली. या तिन्ही संघाच्या यशस्वी कामगिरीसाठी प्राचार्य गजानन उईके, उपप्राचार्य प्रा. किशोर राठोड, पर्यवेक्षक किरण राय, शिक्षण निरीक्षक प्रा. अरुण नरवडे यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.दोन दिवस सुरू असलेल्या या सामन्यासाठी तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक, खो-खो संघ तसेच विद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. यशस्वी विद्यार्थ्यांचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.