माहुली चोर येथील शेतकरी संतप्त
नांदगाव खंडेश्वर/ तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील माहुली चोर येथील शेतकऱ्याला वन्य प्राण्यांपासून झालेल्या पिकाच्या नुकसानीबाबत वनविभागाकडून कडून केवळ रु.1223 मोबदला देऊन शेतकऱ्याची एक प्रकारे चेष्टा केली. त्यामुळे अक्षय पवार या शेतकऱ्याने सदर मोबदला चेकद्वारे वन विभागाकडे परत केला. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील माहुली चोर तसेच परिसरात वन विभागाचे मालकीची बाभूळबन आहे. त्यामुळे या परिसरात रोहि, हरिन,डुक्कर या प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात त्रास शेतकऱ्यांना आहे. हे प्राणी शेतकऱ्याच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. या प्राण्यामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानी बाबत वन विभागाकडे अर्ज केल्यास त्याचा मोबदला शेतकऱ्यांना मिळतो. सदर मोबदला हा पंचनाम्यात दर्शविलेल्या नुकसानीचे प्रमाण विचारात घेऊन दिले जातो.

शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान वन्य प्राणी एका दिवशी न करता आज या भागात तर उद्या त्या भागात नुकसान करतात. असे असताना शेतकरी वर्षभरात साधारण एकदा नुकसानुची तक्रार करतो. तक्रार ऑनलाईन केल्यानंतर अर्जाची प्रत सुद्धा द्यावे लागते. त्यानंतर वनविभाचे कर्मचारी, कृषी सहायक यांनी ठरवलेल्या तारखेला शेतात पंचनाम्या करिता इतर कामे बाजूला ठेवून शेतकऱ्याला शेतात हजर राहावे लागते. पंचनामा करतेवेळी वन विभागाचे कर्मचारी कृषी सहायक तलाठी हे केवळ पंचनाचे दिवसी झालेलेच नुकसान पंचनाम्यात दर्शवितात. पंचनाम्याचे आधी खाल्लेल्या पिकाला पंचनामाचे वेळी पालवी आलेली असते. तसेच पंचनामा नंतर सुद्धा पिकाची नुकसान वन्य प्राणी करतातच.बहुतेक वेळी तुर पिकांचे 100% नुकसान असते.परंतु पंचनामा करणारे वनविभागाचे कर्मचारी, तलाठी, कृषी सहायक हे केवळ ज्या दिवशी पिकाचा पंचनामा असतो त्याच वेळेस त्यांना दिसणारं नुकसान पंचनाम्यात दर्शवतात. त्यामुळे शेतकऱ्यांच खूप मोठ नुकसान असताना त्यांना मिळणारी मोबदला अतिशय अल्प असतो. त्यामुळे येथील शेतकरी अक्षय पवार यांनी त्यांना सोयाबीन पिकाचे नुकसानी बाबत मिळालेला रु.1223 चा मोबदला धनादेशाव्दारे वनविभागानाला परत केला. या वेळी येथील ग्रा प सदस्य निखिल चोरे, बाजार समिती सदस्य अंकुश कोल्हे ,श्याम तीखीले , संदीप सरोदे, अतुल जाधव, विशाल राऊत, मनीष देठे, भूषण साव यांची उपस्थिती होती.
