
स्थानिक गुन्हे शाखा अमरावतीची यशस्वी कारवाई
अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
लहान देवी मंदिर, कुन्हा येथील दानपेटी फोडून सुमारे ५५०० रुपये चोरी करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीणच्या पथकाने अवघ्या काही दिवसांत कुन्हा बसस्थानक परिसरातून अटक केली आहे.
तक्रारदार प्रदिपसिंग पचलोरे (वय ६५, रा. कुन्हा) यांनी १९ जुलै २०२५ रोजी पोलीस स्टेशन कुन्हा येथे तक्रार दाखल केली होती की अज्ञात इसमाने मंदिरातील दानपेटीचे कुलूप तोडून अंदाजे ५५०० रुपये चोरले आहेत. या प्रकरणी गुन्हा क्र. २७३/२०२५, कलम २०५(ड), भा.दं.सं. (BNS) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.जिल्हा पोलिस अधीक्षक मा. श्री. विशाल आनंद यांच्या आदेशानुसार मंदिर चोरीच्या घटनांवर आळा बसविण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला निर्देश देण्यात आले. यानुसार पो.नि. किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मो. तस्लीम आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला.तपासादरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे मंदिर चोरीसाठी संशयित व्यक्ती कुन्हा बस स्टँड परिसरात असल्याची खबर मिळाली.तात्काळ कारवाई करत संशयिताला ताब्यात घेण्यात आले. त्याने आपले नाव कुणाल उर्फ आदेश अरुण पारडे (वय ३०, रा. चांगापूर, अमरावती) असे सांगितले. चौकशीत त्याने चोरीची कबुली दिली आणि त्याच्याकडून ११५० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली.याव्यतिरिक्त त्याने अंबापुर (चांदूर रेल्वे) येथील मंदिरात दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केल्याचेही उघड झाले. त्या प्रकरणी गुन्हा क्र. ३०२/२०२५, कलम ३०३(२) BNS नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीला पुढील तपासासाठी पो.स्टे. कुन्हा यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.ही संपूर्ण कारवाई मा. पोलीस अधीक्षक विशाल आनंद, मा. अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, पो.नि. किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनात पो.उप.नि. मो. तस्लीम यांच्यासह अमोल देशमुख, मंगेश लकडे, सचिन मसांगे, दिनेश कनोोगा, चालक निलेश आवंडकर यांच्या पथकाने केली.