मोर्शी/संजय गारपवार
मोर्शी तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामरोजगार सेवक ,केंद्र चालक यांची तालुकास्तरीय कार्यशाळा घेऊन त्यांना अभियानाबाबत माहिती देण्यात आली. सदर अभियान दि. 17 सप्टेंबर ते दि. 31 डिसेंबर या कालावधीत 100 दिवसाच्या मोहीम स्वरूपात राबवण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

याप्रसंगी मोर्शी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी स्वप्निल मगदूम, तहसीलदार सागर ढवळे, तालुका वैद्यकीय अधिकारी महेश जयस्वाल, सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीमती प्रीती खटिंग, बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती सुजाता देशमुख, पशुधन विकास अधिकारी प्रमोद ढोबळे, विस्तार अधिकारी पंचायत, ज्ञानेश्वर गायकवाड विस्तार अधिकारी शिक्षण, विश्वास फंदे विस्तार अधिकारी कृषी, जयंत गारले विस्तार अधिकारी आरोग्य,आणि विक्रांत शेंदरकर विस्तार अधिकारी सांख्यिकीआणि पंचायत समितीचे विभाग प्रमुख उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी स्वप्निल मगदूम यांनी केले. सदर कार्यशाळेला प्रशिक्षक म्हणून भोजराज पवार विस्तार अधिकारी पंचायत व अजय फाटे ग्रामपंचायत अधिकारी यांनी मार्गदर्शन केले.तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी पंचायत सुधाकर भिवगडे यांनी केले.
