
शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी किल्ला व कैलास टेकडीवर स्वच्छता आणि वृक्षारोपण मोहिम राबवली
श्रीक्षेत्र माहूर / संजय घोगरे
माहूर शहरातील खासगी शिकवणी घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षकांसह श्री इंजाळा कुंड किल्ला,वनदेव देवस्थान आणि कैलास टेकडी परिसरात स्वच्छता मोहीम राबवून वृक्षारोपण केले. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना विविध वनऔषधी, जंगली पशुपक्षी यांची माहिती देऊन ज्ञानात भर घालण्यात आली.जगदंब कोचिंग क्लासेसचे शिक्षक आकाश बेहेरे यांच्या पुढाकारातून दोन दिवसीय स्वच्छता आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रथम पवित्र इंजाळा कुंड किल्ला, घनदाट जंगलातील वनदेव देवस्थान तसेच जगभर प्रसिद्ध पवित्र कोरी भूमी कैलास टेकडी येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. दुसऱ्या दिवशी या ठिकाणी विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.या उपक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून आकाश बेहेरे, गजानन चुनाळकर तसेच विद्यार्थी खुशी निलेश जयस्वाल, साक्षी वर्मा, आरुषी महल्ले, साई दवणे, पियुष बेहेरे, वैभव कांबळे, जय भंडारे, सृष्टी बेहेरे, सानिधी सौदलकर, मयुरी गोडसे, योगिराज जाधव, आर्थन गव्हाणे, भावेश बेहेरे, संकेत बेहेरे, स्वराज तुपदाळे व इतर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण होऊन निसर्ग संवर्धनाची जाणीवही निर्माण झाली आहे.