नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
मंगरूळ चवाळा मधील आपल्या अभिनव व सामाजिक व शैक्षणिक विकास व्हावा यासाठी विविध स्पर्धा व उपक्रम आयोजित करणारे तरूण उत्साही दुर्गा माता मंडळाचे संपूर्ण जिल्ह्यात नावलौकिक आहे. या विविध उपक्रमांपैकी एक प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज गृप, सावित्रीबाई फुले गृप, राजमाता जिजाऊ गृप, शहिद भगतसिंग गृप असून प्रत्येक गृप मध्ये चार स्पर्धक होते. यामध्ये शिवाजी गृपमधील नंदन काकडे, श्रेयस गंधे, अनुज राऊत, यश वारकर हे विजयी झाले. त्याचप्रमाणे शहिद भगतसिंग मध्ये आदित्य कुकडे, कार्तिक अवझाडे, सागर बुधले, युवराज सुरजूसे यांनी खुप चांगली स्पर्धा केली. सावित्रीबाई गृपमध्ये विराट अवझाडे, सोनाली चरपे, खुशी गुल्हाने, अक्षरा काकडे व तसेच जिजाऊ गृप मध्ये मानवी तांबटकर, अनुश्री गुल्हाने, गुंजन गंधे, पंखुडी मुल्हार या सर्व स्पर्धकांनी खुप छान स्पर्धा करून प्रश्नांची उत्तरे दिली. प्रेक्षकांसाठी विचारलेल्या मजेशीर प्रश्नांची अतिशय तल्लख प्रेक्षकांनी योग्य उत्तरे दिली. स्पर्धेचे संपूर्ण नियोजन व सुत्रसंचालन मनोज गावनेर यांनी केले तसेच परिक्षण व तज्ज्ञ मंडळाचे अध्यक्ष सतिश शिंदे यांनी केले. यावेळी मुख्य व्यवस्थापक गणेश अवझाडे, उपाध्यक्ष पंकज चरपे, सचिव चेतन करडे, सहसचिव पंजाब सुरजूसे, सागर गावनेर, गौरव गुल्हाने, जय चरपे, सुमित बुधले व मंडळाचे सर्व सदस्य, महिला हजर होते. याचपद्धतीच्या मंडळाच्या पत्रकानुसार घेण्यात येणाऱ्या शिक्षणाचे महत्त्व या विषयावरील वक्तृत्व स्पर्धा मध्ये सहभागी होण्याचे तसेच मंडळाचा अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम वर्ग 1 ते 12 मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा व विविध स्पर्धांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा , नृत्य व नाट्य स्पर्धा, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन, संगित खुर्ची, निंबु चमच, परिसर स्वच्छता, वृक्षारोपण, शेतकरी व महिला मार्गदर्शन, सामाजिक जागृती करणारे भजनांचा कार्यक्रम इत्यादी प्रकारचे अनेक सारे कार्यक्रम मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, महिला व नागरिक, पोलिस स्टेशन, जि.प. शाळा, ग्रामपंचायत, गावातील प्रतिष्ठित नागरिक यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील राहतात.
