
टोल कर्मचार्यांची वारकर्यांशी अरेरावी
तिवसा /रामचंद्र मुंदाने
१८ जुन ते १० जुलै दरम्यान मानाच्या पालख्या पंढरपुर येथे जाणार्या मार्गावर वारकर्यांना टोल माफीचा शासनाचा आदेश असतांना सुध्दा सोलापुर पंढरपुर राष्ट्रीय महामार्गावर तांबुलवाडी येथील टोलनाक्यावर पालख्या असलेल्या गाड्यांकडून अवैध टोल वसुली करत असल्यामुळे येथे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते . टोल वसुलीवरून वारकरी अमरावती येथील संत गाडगेबाबा मंडळ भारतीय जनता पार्टी अमरावती चे अध्यक्ष तथा अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे अडते छोटुभाऊ उर्फ अभिजीत वानखडे आणि टोल नाका कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार वादावादी झाली . छोटू भाऊ उर्फ अभिजीत वानखडे यांच्यासह वारकऱ्यांनी टोल नाक्यावरील वाहतूक रोखत रस्त्यावरच आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला असता . टोल कर्मचाऱ्यांनी नंतर विना टोल गाड्या सोडून दिल्या. आषाढी एकादशी निमित्त अमरावती जिल्ह्यासह विविध जिल्ह्यातील पालख्या पंढरपूर येथे गेल्या होत्या . आषाढी एकादशी झाल्यानंतर पंढरपूर वरून आपापल्या गावी परत येत असताना सोलापूर पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील तांबुलवाडी टोल नाक्यावर वारकऱ्यांच्या गाड्या अडवून टोल कर्मचारी वारकऱ्यांसी अरेरावी करून टोल वसूल करीत होते . वारकऱ्यांच्या गाड्यांना टोल माफी देण्यात आल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडवणीस यांनी जाहीर केले असतांना सुध्दा शासनाच्या आदेशाची पायमल्ली करत येथील टोल नाक्यावर टोल माफीयांची वारकऱ्यांकडून अवैध टोल वसुली सुरु होती. मात्र छोटू भाऊ उर्फ अभिजीत वानखडे यांना ही बाब माहिती पडताच त्यांची व टोल कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. मात्र त्यांनी वारकऱ्यांसह टोल नाक्यावरील रस्त्यावरच ठाण मांडून आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने काही काळ येथे वाहतूक कोंडी झाली . वाहतूक खोळंबल्याचे पाहून टोलनाका कर्मचार्यांनी माघार घेऊन वारकर्यांच्या गाड्या विना टोल सोडण्यात आल्याचे संत गाडगे बाबा मंडळ भारतिय जनता पार्टी अमरावती चे अध्यक्ष छोटु ऊर्फ अभिजीत वानखडे यांनी सांगीतले.