December 2, 2025

Viral news

घशाचा संसर्ग; रुग्णालयात सर्दी-खोकल्याचे वाढले रुग्ण नांदगाव खंडेश्वर/ उत्तम ब्राम्हणवाडे  बदलते हवामान, त्यातच तापाची साथ अशा वातावरणात...
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे लोकाभिमुख अभियान – गटविकास अधिकारी योगेश वानखडे पंचायत समिती अंतर्गत मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान कार्यशाळा सरपंच,उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांची उपस्थिती धामणगाव रेल्वे,ता.१३:- ग्रामपंचायत म्हणजे राज्य व केंद्र सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्याचे सर्वोत्तम साधन आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सात घटकांवर आधारित आहे. सर्व ग्रामस्थांनी मिळून एकत्रित काम केल्यास गावांचा विकास शक्य आहे. गाव अधिकाधिक स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावेत तसेच जलसमृद्ध गाव करणे हा प्रमुख दृष्टिकोन असावा,असे प्रतिपादन गटविकास अधिकारी योगेश वानखडे यांनी केले. पंचायत समिती धामणगाव रेल्वे येथे मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान तालुका स्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अध्यक्षपदावरून गटविकास श्री वानखडे बोलत होते. मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान बाबत पंचायत समिती धामणगाव रेल्वे येथे तालुका स्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून तहसीलदार अभय घोरपडे उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष गट विकास अधिकारी योगेश वानखडे आणि सर्व तालुका स्तरीय विभाग प्रमुख उपस्थितीत होते. कार्यशाळेत तालुक्यातील सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, रोजगार सेवक,संगणक परिचालक, ग्रामस्तरीय कर्मचारी यांना अभियान बाबत प्रशिक्षक व विस्तार अधिकारी प्रवीण उलेमाले पुरूषोत्तम उलेमाले,विस्तार अधिकारी पंचायत अमोल गेडाम यांनी सविस्तर प्रशिक्षण दिले.यावेळी उद्घाटक म्हणून बोलतांना तहसीलदार अभय घोरपडे म्हणाले की, गावांचा शाश्वत व सर्वांगीण विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत योजना जनतेच्या दारी पोहोचतील.सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक विस्तार अधिकारी निलेश वाघ यांनी केले.संचालन विशाल सुटे यांनी व आभार गटशिक्षणाधिकारी सपना भोगावकर यांनी मानले. ———– ग्रामविकास मंत्रालयाकडून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे लोकायुक्त अभियान १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यान राबविण्यात येणार आहे. गावांचा विकास होण्याच्या दृष्टीने हे एक सकारात्मक पाऊल आहे. या अभियानात सर्व ग्रामस्थांनी मिळून एकत्रित काम केल्यास गावांचा अधिक विकास होऊ शकतो. योगेश वानखडे,गटविकास अधिकारी ————– फोटो

पंचायत समिती अंतर्गत मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान कार्यशाळा सरपंच,उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांची उपस्थिती धामणगाव रेल्वे /तालुका प्रतिनिधी ...
आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यवतमाळ / जिल्हा प्रतिनिधी  आदिवासी...
error: बातमी कॉपी करणे गुन्हा आहे !!