विद्यापीठात राज्य युवा धोरणाबाबत विशेष बैठकीचे आयोजन
अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
राज्यभरातील युवा कार्यक्रमाबाबत ध्येय, उद्दिष्ट व कार्यक्रम अंबलबजावणी करण्याकरिता राज्याच्या युवा धोरणाची निर्मिती करण्यात येते महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने राज्याच्या नवीन युवा धोरणासंदर्भात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र राज्यात युवा धोरण, २०१२ च्या आधारे सुधारित युवा धोरण तयार करण्यासाठी एक नवीन समिती गठीत करण्यात आली आहे.ही समिती राज्य युवा धोरणाबाबत आपल्या शिफारशी शासनाला सादर करणार असून त्याबाबत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने विशेष बैठकीचे नुकतेच करण्यात आली असून या बैठकीची अध्यक्षता अमरावतीचे सुपुत्र तथा भारत सरकार क्रीडा व युवक कल्याण विभागाचे राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तथा अंतर्राष्ट्रीय सार्क संघटनेचे युवा दूत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे माजी राज्यपाल नामित सिनेट सदस्य तसेच महाराष्ट्र शासनाचे विशेष कार्यकारी अधिकारी समितीचे विशेष निमंत्रित सदस्य डॉ. मनीष शंकरराव गवई यांनी केली.राज्यातील युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य युवा धोरणानिर्मिती होत असून राज्यातील युवकांसाठी नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी युवकांशी संवाद साधण्यासाठी युवा संवाद दौरा अंतर्गत या बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे डॉ. विशाल गजभिये अमरावती शहर जिल्हा समन्वयक, डॉ. सुधीर कोहोचाडे अकोला जिल्हा समन्वयक,डॉ. विकास देशमुख अमरावती ग्रामीण जिल्हा समन्वयक,डॉ. हनुमंत भोसले बुलढाणा जिल्हा समन्वयक,डॉ. नीलिमा दवणे यवतमाळ जिल्हा समन्वयक,डॉ.राजीव बोरकर संचालक विद्यार्थी विकास,डॉ निलेश कडू संचालक राष्ट्रीय सेवा योजना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ उपस्थित होते. या प्रसंगी महाराष्ट्र शासन राज्य युवा धोरण विशेष निमंत्रित सदस्य डॉ. मनीष गवई यांचे डॉ निलेश कडू संचालक व राष्ट्रीय सेवा योजना डॉ.राजीव बोरकर संचालक विद्यार्थी विकास यांनी पुष्पगुच्छ व ग्रामगीता देऊन विद्यापीठाच्यावतीने स्वागत केले.अनेक वर्षांपासून राज्याच्या युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी एक सक्षम धोरणाची आवश्यकता होती. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र राज्याचे युवा धोरण, २०१२’ हे धोरण जाहीर केले होते. मात्र, १० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटल्याने, हे धोरण सध्याच्या गरजांनुसार अपुरे पडू लागले होते. त्यामुळे, राज्याच्या युवा धोरणामध्ये सुधारणा करून नवीन धोरण तयार करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्याचे सुधारित युवा धोरण तयार करण्याबाबत गठीत युवा धोरण समितीची पहिली बैठक नुकतीच विधान भवनात पार पडली.संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात आयोजित बैठकीत नव्या धोरणात शिक्षण, रोजगार, उद्योजकता, स्टार्टअप्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), बौद्धिक व सामाजिक विकास तसेच राष्ट्रप्रेम, जबाबदारीची जाणीव आणि नेतृत्वगुणांची जोपासना याबाबींचा समावेश असावा अशा सूचना करण्यात आल्या .विकसित भारत 2047 च्या दिशेने वाटचाल करताना, नव्या पिढीच्या गरजांनुसार धोरण तयार करणे आवश्यक आहे. शहरी व ग्रामीण भागांतील युवकांना समान संधी मिळाव्यात, यासाठी प्रशिक्षण, सुविधा व योजनांचा समावेश असलेले समतोल धोरण तयार करावे असे देखील सुचविण्यात आले . या धोरणांतर्गत युवा प्रशिक्षण केंद्रे, वसतीगृहे, युवा निधी, पुरस्कार, महोत्सव, व्यक्तिमत्त्व विकास उपक्रम तसेच युवा प्रतिष्ठा निर्देशांक यांचा समावेश करण्यात यावा. युवकांचे विचार आणि अपेक्षा समजून घेऊनच हे धोरण आखले गेले पाहिजे. यासाठी शाळा, महाविद्यालये, सोशल मीडिया, सेवा क्षेत्रातील प्रतिनिधी यांना सहभागी करून त्यांच्या सूचनांचा धोरणात समावेश करावा, धोरणात युवक कल्याण विभागाबरोबरच इतर विभागांनीही संघटितपणे आणि समन्वयाने काम करण्यात यावे असे देखील नमूद केले.डॉ मनीष गवई यांनी आपल्या शिफारशी मांडल्या असून राज्यातील युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य युवा धोरणानिर्मिती होत असल्याचे प्रतिपादन देखील त्यांनी केले तसेच हे नवीन धोरण युवकांना शिक्षण, रोजगार, क्रीडा, कौशल्य विकास आणि सामाजिक सहभागाच्या संधी उपलब्ध करून देण्यास मदत करेल. त्याकरिता राज्यातील युवकांसाठी नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी युवकांशी संवाद साधण्यासाठी युवा संवाद दौरा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आलेलया शिफारसींचा विचार करून नवीन युवा धोरणाचा मसुदा तयार करणार असून हे नवीन धोरण राज्याच्या विकासात महत्त्वाचे योगदान देईल आणि युवकांना आत्मनिर्भर बनण्यास मदत करेल अशी आशा विशेष निमंत्रित समिती सदस्य डॉ मनीष गवई यांनी व्यक्त केली . याप्रसंगी झेनिथ युवक मंडळाचे सांस्कृतिक सचिव मिथिल कळंबे, बैठकीचे समन्वयक विशुधनानंद जवंजाळ उपस्थित होते.

