
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत डॉ. मनीष गवई यांनी मांडल्या राज्य युवा धोरणाबाबत शिफारशी
अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
राज्यभरातील युवा कार्यक्रमाबाबत ध्येय, उद्दिष्ट व कार्यक्रम अंबलबजावणी करण्याकरिता राज्याच्या युवाधोरणाची निर्मिती करण्यात येते महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडाविभागाने राज्याच्या नवीन युवा धोरणासंदर्भात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र राज्यात युवा धोरण, २०१२ च्या आधारे सुधारित युवा धोरण तयार करण्यासाठी एक नवीन समितीगठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये अमरावतीचे सुपुत्र तथा भारत सरकार क्रीडा वयुवक कल्याण विभागाचे राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तथा अंतर्राष्ट्रीय सार्कसंघटनेचे युवा दूत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे माजी राज्यपाल नामित सिनेटसदस्य तसेच महाराष्ट्र शासनाचे विशेषकार्यकारी अधिकारी डॉ. मनीष शंकरराव गवई यांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निवड करण्यात आली असून त्यांनीराज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्य युवाधोरणाबाबत शिफारशी मांडल्या. याप्रसंगी राज्यातीलयुवकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य युवा धोरणानिर्मिती होत असल्याचे प्रतिपादनदेखील त्यांनी केले. राज्यातील युवकांसाठीनाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी युवकांशी संवाद साधण्यासाठी युवा संवाद दौराकरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्रीश्री दत्ता भरणे यांनी विशेष निमंत्रित सदस्य डॉ. मनीष गवई यांचे पुष्पगुच्छ देऊनस्वागत केले. अमरावतीचे सुपुत्र डॉ मनीष गवई यांची सामाजिक तथा युवक कल्याण क्षेत्रातीलआंतरराष्ट्रीय पातळीवर वरील भरीव कामगिरीला पाहून ही निवड करण्यात आली आहे.याबाबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षणव क्रीडा विभागाने दिनांक २८. ०५. २०२५ ला आदेश देखील काढला आहे. अनेक वर्षांपासूनराज्याच्या युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी एक सक्षम धोरणाची आवश्यकता होती. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र राज्याचे युवा धोरण, २०१२’ हे धोरण जाहीर केले होते. मात्र, १० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटल्याने, हे धोरण सध्याच्या गरजांनुसार अपुरे पडू लागले होते. त्यामुळे, राज्याच्या युवा धोरणामध्ये सुधारणाकरून नवीन धोरण तयार करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.नवीन धोरणाच्यानिर्मितीसाठी आणि जुन्या धोरणामध्ये आवश्यक ते बदल करण्यासाठी शासनाने एकउच्चस्तरीय समिती नेमली आहे. या समितीमध्ये अनुभवी मंत्री, अधिकारी आणि तज्ञांचा समावेश असूनसमितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी राज्याचेक्रीडा व युवक कल्याण मंत्री यांच्यावर सोपविण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्याचे सुधारित युवा धोरण तयारकरण्याबाबत गठीत युवा धोरण समितीची पहिली बैठक नुकतीच विधान भवनात पार पडली.यानव्या धोरणात शिक्षण, रोजगार, उद्योजकता, स्टार्टअप्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), बौद्धिक व सामाजिक विकास तसेचराष्ट्रप्रेम, जबाबदारीची जाणीव आणि नेतृत्वगुणांचीजोपासना यावर विशेष भर दिला जाणार आहे.विकसित भारत 2047 च्या दिशेने वाटचाल करताना, नव्या पिढीच्या गरजांनुसार धोरण तयार करणे आवश्यक आहे. शहरी वग्रामीण भागांतील युवकांना समान संधी मिळाव्यात, यासाठी प्रशिक्षण, सुविधा व योजनांचा समावेश असलेले समतोल धोरण तयार केले जाईल. याधोरणांतर्गत युवा प्रशिक्षण केंद्रे, वसतीगृहे, युवा निधी, पुरस्कार, महोत्सव, व्यक्तिमत्त्व विकास उपक्रम तसेच युवा प्रतिष्ठा निर्देशांक यांचासमावेश करण्यात येणार आहे. युवकांचे विचार आणि अपेक्षा समजून घेऊनच हे धोरण आखलेगेले पाहिजे. यासाठी शाळा,महाविद्यालये, सोशल मीडिया, सेवा क्षेत्रातील प्रतिनिधी यांनासहभागी करून त्यांच्या सूचनांचा धोरणात समावेश करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांनी संबंधित विभागांना दिले. तसेच, युवक कल्याण विभागाबरोबरच इतर विभागांनीही संघटितपणे आणि समन्वयानेकाम करावे, असेही त्यांनी नमूद केले.विशेष म्हणजेही समिती दर्जा प्राप्त असून राज्यभरातील युवा कार्यक्रमाबाबत ध्येय, उद्दिष्ट व कार्यक्रम अंबलबजावणी करणारी महत्वाची समिती आहेयाप्रसंगी मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत डॉ मनीष गवई यांनी आपल्या शिफारशीमांडल्या असून राज्यातील युवकांच्यासर्वांगीण विकासासाठी राज्य युवा धोरणानिर्मिती होत असल्याचे प्रतिपादन देखीलत्यांनी केले तसेच हे नवीन धोरण युवकांना शिक्षण, रोजगार, क्रीडा, कौशल्य विकास आणि सामाजिक सहभागाच्या संधी उपलब्ध करून देण्यास मदत करेल. त्याकरिता राज्यातीलयुवकांसाठी नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी युवकांशी संवाद साधण्यासाठी युवासंवाद दौरा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आलेलया शिफारसींचा विचार करून नवीनयुवा धोरणाचा मसुदा तयार करणार असून हे नवीन धोरण राज्याच्या विकासात महत्त्वाचेयोगदान देईल आणि युवकांना आत्मनिर्भर बनण्यास मदत करेल अशी आशा विशेष निमंत्रितसमिती सदस्य डॉ मनीष गवई यांनी व्यक्त केली .यावेळी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री दत्ता भरणे यांनीविशेष निमंत्रित सदस्य म्हणून डॉ. मनीष गवई यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागतकेले. त्यांसाठी डॉ. मनीष गवई हेमहाराष्ट्रातील युवकाशी थेट संवाद साधून चर्चा करणार आहेत आणि राज्याचे सुधारितयुवा धोरण कसे असावे याबाबत युवकांच्या माध्यमातून सूचना व प्रस्ताव स्वीकारणारआहेत याबाबत अधिक माहितीकरिता ९३७०१००८९८ वर संपर्क साधण्याचे आवाहन देखील करण्यातआले आहे या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री तथा समितीचे अध्यक्ष दत्तात्रय भरणे, आ. प्रवीण दटके, आ. संतोष दानवे, आ. श्रीकांत भारतीय, आ. देवेंद्र कोठे, आ. सुहास कांदे, आ. राजेश पवार, आ. आशुतोष काळे, आ. प्रकाश सुर्वे, आ. श्रीकांत भारतीय, आ अमोल मिटकरी, आ. रोहित पाटील, युवक बिरादरीचे संस्थापक पद्मश्रीक्रांती शाह तसेच राज्य व राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेते उपस्थित होते.