नगर पंचायत मुख्याधिकारी यांचे कडे अ.भा.वि.प ची मागणी.
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, नांदगाव खंडेश्वरच्या वतीने सोमवार दिनांक ०६ एप्रिल २०२५ रोजी नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनात नमूद करण्यात आले की, येथील बस स्टँड परिसरात उभारण्यात आलेला जलकुंभ / पाणीपोई अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असून नागरिकांना त्याचा कोणताही लाभ मिळत नाही. सध्या वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रवासी, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.

तसेच संबंधित ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झालेल्या अतिक्रमणामुळे जलकुंभ नागरिकांच्या नजरेस पडत नसून त्याचा वापर होण्यास अडथळे निर्माण होत आहेत, ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून संबंधित अतिक्रमण तात्काळ हटवून जलकुंभ / पाणीपोई त्वरित सुरू करण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा विद्यार्थी व नागरिकांच्या हितासाठी आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.

यावेळी नगरमंत्री ओम मोरे, प्रसाद भगत, अमन काकडे, अनिकेत चवाले,ऋषिकेश शेगोकर,हरीओम देशमुख,संतोष तरारे,संकेत घोडे, अभय राजुरकर,हरीओम झोड,ऋतिक देवतळे, विक्कि जाधव इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
