
विद्यापीठात ‘धर्माचा वैदिक वाड्.मयातील उदय आणि विकास’ यावर व्याख्यान संपन्न
अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
धर्म आणि रिलिजन यामध्ये मोठा फरक सांगताना समाजशास्त्रीय दृष्टीकोनावर डॉ. भाऊसाहेबांचा अधिक कटाक्ष होता, असे मौलिक विचार पुणे येथील धर्म व तत्त्वज्ञानाचा गाढे अभ्यासक डॉ. प्रदीप गोखले यांनी मांडले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ.पंजाबराव देशमुख प्रादेशिक अर्थव्यवस्था नियमन केंद्राच्या वतीने डॉ.पंजाबराव देशमुख यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात डी.फिल. पदवीसाठी केलेल्या संशोधनाच्या शताब्दी निमित्ताने विद्यापीठ परिसरातील डॉ. श्रीकांत जिचकार स्मृति संशोधन केंद्र येथील सभागृहात विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी ते बोलत होते.विचारपीठावर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, प्रमुख अतिथी म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीचे अध्यक्ष तथा विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. हर्षवर्धन देशमुख, डॉ. पंजाबराव देशमुख प्रादेशिक अर्थव्यवस्था नियमन केंद्राचे समन्वयक डॉ. महेंद्र मेटे उपस्थित होते.डॉ. गोखले पुढे म्हणाले, धर्माच्या अनेक व्याख्या आहेत; परंतु डॉ. भाऊसाहेबांना धर्माची समाजकेंद्रित व्याख्या अपेक्षित होती. डॉ. भाऊसाहेबांनी ई·ारनिष्ठ धर्माचा उगम नाकारला. उत्क्रांतीवादी दृष्टीकोन डॉ. भाऊसाहेबांना मान्य होता, असेही डॉ. गोखले म्हणाले.प्रमुख अतिथी डॉ. हर्षवर्धन देशमुख म्हणाले, डॉ. भाऊसाहेबांचे प्रचंड महान कार्य आहे. त्यांच्या कार्याचे अनेक पैलू आहेत. समाजासमोर ते आज मांडले जात आहेत, याचा आनंद होत आहे. बहुजनांच्या शिक्षणाचा विचार विदर्भात डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी, तर पश्चिम महाराष्ट्रात कर्मवीर भाऊराव पाटील यांनी मांडला आणि तो प्रत्यक्ष कृतीत उतरविला. डॉ. भाऊसाहेब म्हणजे थोर व्यक्तिमत्व, समाजासाठी झटणारे व्यक्तिमत्व होते, असे डॉ. देशमुख म्हणाले.
डॉ. भाऊसाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू आज ऐकता आले – कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते
अध्यक्षीय भाषण करतांना कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते म्हणाले, 1926 साली डॉ. भाऊसाहेबांनी प्रबंध लिहिला आणि त्यांना ऑक्सफोर्ड विद्यापीठाने डी. फील पदवी बहाल केली. एवढेच नाही, तर 1933 साली त्या प्रबंधाचे ग्रंथात रुपांतर झाले. अमरावती विद्यापीठाने या ग्रंथाचा मराठीत अनुवाद करुन डॉ. भाऊसाहेबांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत मातृभाषेत पोहचविले. ते म्हणाले, डॉ.भाऊसाहेबांची भाषेवर मोठी पकड होती. अतिशय उच्च कोटीची त्यांची इंग्रजी भाषा होती. व्याख्यात्यांनी डॉ. भाऊसाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू आज व्याख्यानाच्या माध्यमातून मांडल्याने ते ऐकता आले. केंद्राच्या माध्यमातून प्रादेशिक असमतोल यावर अभ्यास केला जात आहे. शेतकरी आत्महत्येच्या समस्येला नव्या अंगाने पहावे लागेल. अध्यासन केंद्रामार्फत रिसर्च प्रोजेक्ट सुरू करण्यात आले आहे असे सांगून विद्यापीठाकडूनही विविध कार्यक्रम आयोजित केले जातील, असा वि·ाास कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी याप्रसंगी व्यक्त केला संत गाडगे बाबा व डॉ. भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन करुन विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविकातून अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ. महेंद्र मेटे यांनी व्याख्यानाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. याप्रसंगी डॉ. नितीन चांगोले व डॉ. वैभव मस्के लिखित ‘युग पुरुष डॉ. पंजाबराव देशमुख’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. सूत्रसंचालन डॉ. भगवान फाळके यांनी, तर आभार डॉ. प्रशांत हरमकर यांनी मानले. व्याख्यान कार्यक्रमाला विद्यापीठ विविध प्राधिकारिणींचे सदस्य, श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणींचे सदस्य, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, विद्यापीठातील शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, अमरावती शहरातील गणमान्य नागरिक मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.