अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
परंपरागत संस्कृती जतन करण्याच्या हेतूने स्मृतिगंध व संगीत सूर्य केशवराव भोसले राष्ट्रीय सांस्कृतिक परिषदेच्या वतीने पहिल्यांदाच विदर्भामध्ये भुलाबाई उत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. हा उत्सव दिनांक ४ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत जेसीआय हॉल, पंचवटी समोर पार पडणार आहे. यावेळी भुलाबाई सुधीर केळे लिखित भुलाबाईची गाणी या पुस्तकाचे प्रकाशनही विद्यमान आमदार सुलभाताई खोडके यांच्या हस्ते पार पडेल. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार सुलभाताई खोडके, सौ आरती राजेश वानखडे ,छायाताई दंडाळे, सुरेखाताई लुंगारे ,डॉक्टर भोजराज चौधरी तसेच अनेक मान्यवर उपस्थित राहतील.या स्पर्धेत सर्व वयोगटातील सहभागी आपल्या शैलीतून भुलाबाई गाणी सादर करू शकतील. गटसादरीकरणाकरिता किमान ७ जणांची उपस्थिती आवश्यक असून पारंपरिक वेशभूषा, गाणी आणि वाद्यांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. प्रत्येक गटाला दहा मिनिटांचा कालावधी उपलब्ध असेल.भुलाबाईच्या उत्सवाचे आयोजनासाठी अमरावती शहरातील सर्व स्तरातील महिलांनी पसंती दर्शवली. तसेच आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी महिला उत्सुक आहेत. अशा प्रकारचे उत्सव नवीन पिढीला कळावे यासाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन फार महत्त्वाचे आहे.या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी पल्लवी वैद्य यादगिरे – ८२०८२६३६०८,सुचिता बर्वे – ८०८७१५९३९६ ,अनिता अडकणे 7385844883 यांना संपर्क करावा.असे आवाहन करण्यात आले आहे.
