चांदुर रेल्वे /तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र नगर परिषद/महानगर पालिका सेवानिवृत्त शिक्षक संघाच्या आज नागपूर येथील शिक्षक भवनात पार पडलेल्या सभेत पुंजाराम नेमाडे (गुरुजी) यांची राज्य उपाध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करण्यात आली.या निवडीला उपस्थित सर्व सदस्यांनी एकमताने अनुमोदन देत सभागृहात आनंदोत्सव साजरा केला.सेवानिवृत्त शिक्षक म्हणून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत राहून उल्लेखनीय योगदान दिलेल्या पुंजाराम नेमाडे गुरुजींच्या निवडीमुळे संघटनेला बळ मिळणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
